Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं घरच्या घरी झटपट बनवा मोतीचूर लाडू

Akshaya Tritiya 2023 : हा दिवस जितका खास आहे, तितकीच खास मेजवानीसुद्धा या दिवशी घरोघरी बनवली जाते. गोडाधोडाचा बेत असल्यामुळं अनेकांनाच दोन घास जास्त जेवण जातं.   

Apr 21, 2023, 12:17 PM IST

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस यंदाच्या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी आला आहे. संपूर्ण देशभरात या दिवशी पवित्र वातावरणासोबतच एक सकारात्मकतेची अनुभूती पाहायला मिळते. 

1/7

मोतीचूर लाडू

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

अशा या सुरेख दिवशी कामाचा व्याप वाढणार आणि घरातले चवीनं खातील असाच पदार्थ तुम्हीही बनवण्याचा विचार करताय का? मोतीचूर लाडू हा पर्याय कसा वाटतोय? घाबरू नका तुम्हाला वाढीव मेहनत करायची नाहीये... चला पाहुया Motichoor Ladoo कसे बनवायचे याची Instant Recipe

2/7

भिजवलेली चणाडाळ

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

यासाठी लागणारं साहित्य असेल, भिजवलेली चणाडाळ 1 कप, तूप पाऊण कप, दोन कप साखर, चिमुटभर खायचा केशरी रंग, एक लहान वाटी सुकामेवा (पिस्ता, काजू, बदाम). मोजकं साहित्य एकत्र केल्यानंतर सर्वप्रथम भिजवलेली चणाडाळ पाण्यातून वेळून दरदरीत वाटून घ्या. मिश्रण पूर्ण बारीक करू नका. साधारण कणीदार वाटून घ्या.   

3/7

साजूक तूप

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

आता एका तव्यात पाऊण कप साजूक तूप गरम करून यामध्ये कणीदार चणाडाळीचं वाटण चांगलं परतून घ्या. डाळीतील पाण्याचा अंश जाऊन ती मोकळी होईल आणि फुलून तिचा रंगही बदलेल तेव्हा समजा डाळ शिजलीये.   

4/7

साखरेचा पाक

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

आता दुसरीकडे एका खोलगट भांड्यात साखरेचा पाक तयार करून घ्या. पाक अतिशय घट्टही नको आणि अतिशय पातळही नको.   

5/7

वेलचीपूड मिसळा.

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिमुटभर खायचा रंग आणि आवडत असल्यास वेलचीपूड मिसळा. 

6/7

पटापट लाडू वळा.

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

मिश्रण कोमट झाल्यानंतर चणाडाळीसोबत एकजीव करा आणि पटापट लाडू वळा. 

7/7

आवडीनुसार सुकामेवा

Akshaya Tritiya 2023 how to make Make instant motichoor ladoo at home know the recipe

आवडीनुसार सुकामेवा आणि त्यातही खास टच ज्यायचा झाल्यास चांदाच वर्ख लावून लाडू एका ताटात सजवा आणि आस्वाद घ्या जीभेवर विरघळणाऱ्या मोतीचूर लाडूचा.