ना अमिताभ, ना सलमान, 'या' व्यक्तीने भरला सर्वात जास्त टॅक्स, टॉप 5 मधून अक्षय कुमार बाहेर

सिनेसृष्टीतील कलाकार बिझनेसमनला टक्कर देऊ शकत नाहीत. पण टॅक्स भरण्यामध्ये कलाकार खूप पुढे आहेत. भारतात अनेक कलाकार आणि क्रिकेटर मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतात. 

| Nov 30, 2024, 15:07 PM IST
1/7

अक्षय कुमार

अक्षय कुमारचे लागोपाठ 10 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे अक्षय कुमारच्या कमाईमध्ये देखील खूप मोठा बदल झाला आहे. त्याचाच परिणाम त्याच्या इनकम टॅक्सवर झाला आहे. 

2/7

सर्वात जास्त टॅक्स

देशात सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या सेलिब्रिटीने 2023 मध्ये 92 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील टॅक्स देणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. 

3/7

शाहरुख खान

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने 92 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. याच कारण आहे 2023 मधील शाहरुख खानचे ब्लॉकबस्टर 3 चित्रपट. या चित्रपटांनी प्रचंड कमाई केली होती. 

4/7

थलापति विजय

शाहरुख खान नंतर सर्वात जास्त टॅक्स भरणारा अभिनेता आहे थलापति विजय. थलापति विजयने 2023-24 मध्ये 80 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. 

5/7

बॉलिवूड कलाकार

त्यानंतर सुपरस्टार सलमान खानचे नाव येते. सलमानने 75 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. तर विराट कोहलीने 66 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. 

6/7

अक्षय कुमार

सर्वात जास्त टॅक्स भरण्यामध्ये अक्षय कुमार टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. सध्या अक्षय कुमारकडे कोणताही ब्लॉकबस्टर चित्रपट नाहीये. 

7/7

आगाऊ कर

फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या आधारावर बनवले गेले आहेत.