मी एक वाईट आई होते....; प्रियंकाबाबतच्या 'त्या' निर्णयाचा मधु चोप्रा यांना अजूनही होतोय पश्चात्ताप

आज प्रियंका चोप्रा एक ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खूपच रंजक आहे. तिच्या या प्रवासात तिला तिची आई मधु चोप्रा यांनी खूप साथ दिली. मात्र, आजही त्यांना प्रियंकाबाबतच्या एका निर्णयाचा पश्चात्ताप आहे. 

| Nov 30, 2024, 14:03 PM IST

Priyanka Chopra Mother Madhu Chopra: आज प्रियंका चोप्रा एक ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खूपच रंजक आहे. तिच्या या प्रवासात तिला तिची आई मधु चोप्रा यांनी खूप साथ दिली. मात्र, आजही त्यांना प्रियंकाबाबतच्या एका निर्णयाचा पश्चात्ताप आहे. 

1/7

मी एक वाईट आई होते....; प्रियंकाबाबतच्या 'त्या' निर्णयाचा मधु चोप्रा यांना अजूनही होतोय पश्चात्ताप

42 Years Old Global Icon Priyanka Chopra Mother Madhu Chopra Still Regrets for one things

बॉलिवूड ते ग्लॉबल स्टार म्हणजे प्रियंका चोप्रा आता सगळ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. मात्र, अलीकडेच तिच्या आईने एक खुलासा केला आहे. 

2/7

प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, प्रियंका जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हा त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याचा त्यांना अजूनही पश्चात्ताप होत आहे. 

3/7

 बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाली आहे. बरेलीसारख्या छोट्या शहरातून आलेली प्रियंका आज आंतरराष्ट्रीय स्टार आहे. 

4/7

प्रियंकाची आई मधु चोप्रा यांना त्यांच्या मुलीवर खूप गर्व आहे. मात्र, त्यांच्या आईला एका गोष्टीचे अजूनही दुःख होतं. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत मधु चोप्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. 

5/7

प्रियंका चोप्रा लहान असताना त्यांनी शिक्षणासाठी तिला बोर्डिंग स्कुलमध्ये ठेवलं होतं. आजही त्या निर्णयामुळं त्यांना पश्चात्ताप होतो. 'मला माहितीये की मी चांगली आई नव्हती, मला या गोष्टीची अद्यापही पश्चात्ताप होतो. तोच विचार करुन मला भावूक व्हायला होतं. ती वेळ माझ्यासाठी खूप कठिण गेली. प्रत्येक शनिवारी मी माझं काम सोडून तिला भेटायला जायची. तिला बोर्डिंग स्कुलमध्ये अॅडजस्ट व्हायला वेळ लागला तिच्यासाठीसुद्धा हे खूप कठिण गेले,' असं मधु चोप्रा यांनी म्हटलं आहे.

6/7

ती प्रत्येक शनिवारी मी येण्याची वाट पाहत असायची. मी तिच्यासोबत वेळ घालवायची. पण तिच्या शिक्षिकेने मला सतत शाळेत तिला भेटायला न येण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मात्र मी शाळेत जायचं कमी केलं. हा निर्णय खूप कठिण होता. मात्र प्रियंकाने स्वतःला नीट सांभाळलं आणि स्वतःच्या पायायवर उभी राहिली. 

7/7

प्रियंकाच्या करिअरमध्ये तिच्या वडिलांनी तिला खूप सपोर्ट केला. वडिलांच्या निधनानंतर प्रियंका तिच्या आईच्या जास्त जवळ येत गेली. प्रियंकाने तिच्या करिअरची सुरुवात 2002मध्ये तामिळ चित्रपट थामिजनपासून सुरू केली. त्यानंतर द हिरो- लव स्टोरी ऑफ स्पायपासून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.