एकीकडे अभिषेकसोबत घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या मेहंदीचे Unseen Photos व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ते दोघं खरंच विभक्त होणार आहेत का की या अफवा आहेत यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत असताना. आता त्यासगळ्यात सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील काही फोटो व्हायरल होत आहे. 

| Dec 13, 2024, 13:52 PM IST
1/7

ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं 'उमराव जान' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, जवळ आले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

2/7

20 एप्रिल 2007 मध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. आता त्यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. खरंतर करिअरमध्ये पीकवर असताना ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न केलं. 

3/7

आता त्यांच्या लग्नाच्या 17 वर्षांनंतर सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

4/7

ऐश्वर्यानं तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात बेबी पिंक कलरचा लेहंगा परिधान केला होता. त्यासोबत खऱ्या ताज्या फुलांपासून बनवलेले सगळे दागिने तिनं परिधान केले होते. 

5/7

त्यात फुलांचा नेकलेस, बाजुबंद, कानातले आणि बिंदी घातले होते. या लूकमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती. 

6/7

ऐश्वर्याच्या मेहंदीचे हे फोटो आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 

7/7

दरम्यान, दुसरीकडे आता ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.