रश्मिका मंदानाला मिळाली नवीन जबाबदारी, आता भारत सरकारसोबत करणार काम

अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 16, 2024, 14:39 PM IST
1/6

नॅशनल क्रश

रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जात. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या ती 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

2/6

नवी जबाबदारी

डीपफेकच्या वाढत्या घटनांमुळे अभिनेत्री रश्मिका मंदानावर एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. 

3/6

I4C ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

अभिनेत्री रश्मिका मंदानाने एक घोषणा केली आहे की तिची I4C ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

4/6

नवीन उपक्रम

रश्मिका मंदाना ही भारत सरकारसोबत सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या एका नवीन उपक्रमाचा भाग असणार आहे. 

5/6

व्हिडीओ शेअर

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 

6/6

कॅप्शन चर्चेत

अभिनेत्री म्हणाली की, मला इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C)चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.