जान्हवीने घातला सोन्याचा ब्लाउज, बोनी कपूर यांची कमेंट चर्चेत

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. या विवाह सोहळ्याला अभिनेत्री जान्हवी कपूरने हजेरी लावली होती. नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. 

Jul 16, 2024, 16:49 PM IST
1/7

अनंत-राधिका विवाह सोहळा

नुकत्याच पार पडलेल्या अनंत -राधिकाच्या विवाहसोहळ्याला अभिनेत्री जान्हवी कपूरने हजेरी लावली होती.

2/7

जान्हवीचा अप्रतिम लुक

या विवाहसोहळ्यात जान्हवी कपूरचा अप्रतिम लुक बघायला मिळला. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

3/7

सोन्याचा ब्लाउज

या शाही सोहळ्यासाठी अभिनेत्रीने चक्क सोन्याचा ब्लाउज परिधान केला होता. सध्या तिच्या या ब्लाउजची जोरदार चर्चा होतेय.

4/7

फोटो शेअर

नुकतेच तिने काही नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंना तिने एक दिवस सोने, एक दिवस हिरा असं कॅप्शन दिलं आहे. 

5/7

जान्हवी कपूरचे कौतुक

त्याचबरोबर अभिनेत्रीचे वडील बोनी कपूर यांनी देखील आपल्या मुलीचे कौतुक केले आहे. 

6/7

बोनी कपूर कमेंट

हिरा, सोने, चांदी..सगळे फिके पडले अशी कमेंट बोनी कपूर यांनी मुलीच्या फोटोंवर केली आहे. 

7/7

हॉट लुकने चर्चेत

जान्हवी कपूर नेहमी तिच्या हॉट आणि सौंदर्याने देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात चर्चेत असते.