फोटो: कंगनाच्या कार्यालयावर कारवाई, कंगना मुंबईत दाखल
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Dakshata Thasale
| Sep 09, 2020, 15:33 PM IST
मुंबई : कंगना रानौत आज दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाली. कंगना मुंबई विमानतळावर दाखल होण्याअगोदरच सेना-रिपाइचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. विमानतळावर उतरताच कंगनाला मोठ्या सुरक्षा प्रमाणात सुरक्षा देण्यात आली. कंगना आपल्या राहत्या घरी खारला पोहोचली आहे. कंगना मुंबईत येण्याअगोदरच तिच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकाम असल्यामुळे महानगरपालिकेने कारवाई केली आहे.
कंगनाने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कंगनाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत या कारवाईवर स्थगिती देण्यात आली आहे.