कारमध्ये AC ने मायलेजवर फरक पडतो का?

कारमधील एसीचा स्पीड कमी जास्त केल्यास त्याचा मायलेजवर परिणाम होतो का ?  याबाबत अनेकांना  प्रश्न पडतो. 

May 21, 2024, 20:39 PM IST
1/7

उन्हाळ्यात प्रवास करताना एसीचा वापर केला जातो. लांबचा प्रवास करताना उकाड्यापासून सुटका मिळावी याकरिता एसी कारला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली जाते. 

2/7

असं असलं तरी कारमधील एसी वापरण्यावर समज गैरसमज आहेत. 

3/7

कारमधील एसीचं कुलिंग किती असावं आणि किती वेळ एसी वापरावा या बद्दल जाणून घेऊयात.   

4/7

कारमधील एसीचा जास्त वापर केल्याने याचा मायलेजवर फरक पडतो असं बऱ्यादा म्हटलं जातं. हे खरं की खोटं या बद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. 

5/7

खरंतर कारच्या एसीचा मेकॅनिजन हा पूर्णत: इंजिनशी जोडलेला असतो. त्यामुळे जाणकारांच्या म्हणण्यानुसार एसीच्या वापराचा कारच्या मायलेजवर फरक पडतो.

6/7

एसी सुरु केल्यावर कंप्रेसरमुळे कारच्या इंजिनवर याचा परिणाम होतो. कंप्रेसर चालण्यासाठी पावरची गरज असते. ही पावर कंप्रेसरला इंजिनपासून मिळते. 

7/7

त्याशिवाय एसी कारच्या बॅटरीला कनेक्ट असल्याने बॅटरीकडून एसीला कमी किंवा जास्त कुलिंगसाठी मदत होते. त्यामुळे याचा परिणाम मायलेजवर होतो. त्यामुळे तुम्ही कारमध्ये एसीचं कुलिंग किती ठेवता यावर कारच्या इंधनावर परिणाम होतो.