या रविवारी मोबाईल बाजूला ठेवा आणि टीव्ही ऑन करा... OTT वर हे 6 चित्रपट-वेब सीरिज नक्की पाहा

OTT This Week : या विकेंडला ओटीटीवर कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज पहायचा हा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगतो जे तुम्ही पाहू शकता. यात भारतीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट- वेबसीरिजचा समावेश असून जे तुम्ही घरबसल्या एन्जॉय करु शकता. 

| Sep 20, 2024, 15:32 PM IST
1/7

या रविवारी मोबाईल बाजूला ठेवा आणि टीव्ही ऑन करा... OTT वर हे 6 चित्रपट-वेब सीरिज नक्की पाहा

2/7

मार्व्हल सिनेमॅटिक यूनिवर्सचा 'अगाथा ऑल अलोंग' ही सीरिज या आठवड्या प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही सीरिज वांडा व्हिजनशी जोडली गेली असून डिज्नी + वर पाहू शकता. 

3/7

जर तुम्ही अॅक्शन चित्रपटांना कंटाळला असाल तर तूम्ही या आठवड्यात इमोशनल ड्रामा पाहू शकता. ही कहाणी तीन बहिणींची आहे ज्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारी वडिलांची सेवा करत असतात. वडिल-मुलीच्या नातेसंबंधांवर आधारीत हा चित्रपट भावूक करणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

4/7

'इनसाइड आउट 2'  सीरिज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 25 सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवरही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या एनिमेशन सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला होता. मेकर्स आात दुसरा भाग घेऊन आलेत.

5/7

अभिनेता आशुतोष राणा यांची 'द मिस्ट्री ऑफ मोक्ष आइलँड' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ही तेलुगू वेब सीरिज आहे. यात आशुतोष राणा यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळालाय. ही सीरिज दर्शक हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. 

6/7

नेटफ्लिक्सवर दक्षिणेतील सर्वात मोठा चित्रपट स्ट्रिम झालाय. 'थंगलन' या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजीत यांनी केलं आहे. मोठा बजेट असलेला हा चित्रपट 15 ऑगस्टला थिएटर्समध्ये  प्रदर्शित झालो होता. आता तो ओटीटीवर आला आहे. 

7/7

जर तुम्हा कॉमेडी हिंदी चित्रपटा पाहायचा असेल तर तुमच्यासाठी 'जो तेरा है वो मेरा है' हा चित्रपट एकदम परफेक्ट आहे. 20 सप्टेंबरला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.