दिवसाला 2 कोटी कमवणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा श्रीमंतीचा गुरुमंत्र; म्हणाला, "9 ते 5 Job करुन..."
9 to 5 Job Wasting Lives: तो केवळ 23 वर्षांचा आहे. पूर्वी तो सुद्धा 9 ते 5 नोकरी करायचा. मात्र त्याने एक निर्णय घेतला आणि त्याचं आयुष्य बदललं. आज तो दिवसाला 2 कोटी रुपये कमवतो. आलिशान आयुष्य जगतो. आपण जसं आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं तसेच आपण जगत असल्याचं तो सांगतो. मात्र आपण केलेली गोष्ट अनेकजण करायला घाबरतात त्यामुळेच ते 9 ते 5 काम करुन आयुष्य खराब करुन घेत असल्याचा त्याचा दावा आहे. हा तरुण आहे तरी कोण? त्याने नेमकं काय केलंय? आणि तो 9 ते 5 नोकरीवर टीका का करतो जाणून घेऊयात...
1/12
2/12
3/12
4/12
5/12
कॅम हा दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. कॅमप्रमाणे जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना तो इतकंच सांगतो की, असं आयुष्य जगणं कोणालाही शक्य आहे. कॅम हा कारपेन्टर म्हणजेच सुतारकाम करण्यासंदर्भातील प्रशिक्षण घेत होता. मात्र प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या 6 महिने आधीच कॅम या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडला. इतक्या कमी मानधनासाठी 12-12 तास राबणे योग्य नाही असं कॅमचं म्हणणं होतं.
6/12
7/12
'डेली मेल'ला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटू लागलं असं कॅम म्हणाला. "अर्थात यात धोका होताच कारण मी शुन्यातून सुरुवात केली. मात्र हेच करायला लोक फार घाबरतात. मात्र असे घाबरणारे लोक काहीही विचार न करता आपलं आयुष्य खराब करुन घेत आहेत," असं कॅम म्हणाला.
8/12
9/12
कॅम अगदी आत्मविश्वासाने लोकांनी 9 ते 5 जॉब सोडावा असा सल्ला देतो. कॅम त्याच्या लेक्चर्समधूनही हेच सांगतो. यासाठी कॅम स्वत:चेच उदाहरण देतो. "लोक त्यांच्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. 9 ते 5 च्या शिफ्टमध्ये काम करुन आयुष्य खराब करुन घेण्याशिवाय ते आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे," असं कॅम म्हणतो.
10/12
11/12
"शाळेत जायचं, डिग्रीपर्यंत शिकायचं आणि उद्योगात अडकून जायचं असं आपल्याला लहानपणापासून शिकवतात. घर खरेदी करा अन् त्यानंतर आयुष्यभर त्याचे पैसे फेडण्यात घालवा. मी अशाच विचारांसहीत काम करत होतो. मात्र एवढ्या कटाटोपानंतर मी किती पैसे कमवू शकतो याचा हिशोब लावल्यानंतर यातून बाहेर पडायचं ठरवलं," असं कॅम सांगतो.
12/12