एका डॉलरसाठी 703000... ट्रम्प जिंकल्याने 'या' देशाच्या अर्थव्यवस्थेची लागली वाट

703000 For One Dollar This Currency Falls To All Time Low: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. 2020 ला पराभूत झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा आर्थिक महासत्तेमधील सर्वात मोठी निवडणूक जिंकली आहे. मात्र या विजयाचा परिणाम वेगळ्याच देशावर झाला असून या देशाचं चलन अभूतपूर्व पडलं आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

Swapnil Ghangale | Nov 07, 2024, 16:42 PM IST
1/13

iranusa

ट्रम्प यांच्या विजयाचा विपरित परिणाम एका वेगळ्याच देशावर झाला असून या देशाचं चलन अभूतपूर्व पडलं आहे.

2/13

iranusa

अमेरिकेमधील राष्ट्राध्य निवडणुकीमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय संपादन केला आहे. बुधवारी मतमोजणी सुरु झाली तेव्हा सुरुवातीपासूनच निर्णयाक आघाडी मिळवत ट्रम्प यांनी शेवटपर्यंत ती कायम ठेवली.

3/13

iranusa

मात्र जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील या सत्तांतरणाचा परिणाम जगभरात या ना त्या माध्यमातून दिसून आला. विशेष म्हणजे ट्रम्प जिंकणार हे समजल्यानंतरच एका देशाच्या चलन मूल्यामध्ये अभूतपूर्व पद्धतीने घसरण झाली. यासंदर्भातील वृत्त 'असोसिएट प्रेस' या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

4/13

iranusa

तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या देशातील चलन एवढं पडलं आहे की एका डॉलरसाठी त्यांना तेथील चक्क 7 लाख 3000 हजार मोजावे लागत आहेत.

5/13

iranusa

ज्या देशाबद्दल आपण बोलतोय त्या देशाचं नाव आहे इराण! ट्रम्प जिंकणार हे स्पष्ट होताच इराणचं चलन म्हणजेच रियालच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. एका डॉलरला 7 लाख 3000 हजार रियाल असा दर बुधवारी पहायला मिळाला. 

6/13

iranusa

2015 साली इराणने जगभरातील मोठ्या देशांबरोबर अणू करार केला होता त्यावेळेस एका डॉलरसाठी 32 हजार रियाल असा येथील चलनाचा दर होता.   

7/13

iranusa

याच वर्षी मे महिन्यामध्ये सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ यांनी राष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेतली तेव्हा येथील चलनाचा दर एका डॉलरसाठी 5 लाख 84 हजार रियाल एवढा होता. सता महिन्यांमध्ये इराणी रियालचं मूल्य आणखी घसरलं आहे.

8/13

iranusa

इराणच्या अण्विक धोरणामुळे जगभरातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळेच त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. सध्या इराणने अनेक अंतरराष्ट्रीय निर्बंध जुगारुन आपला अण्विक कार्यक्रम सुरुच ठेवला आहे. ते आता युरेनियमचा वापर शस्रांमध्ये करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

9/13

iranusa

सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ यांनी सत्तेत येताना पाश्चिमात्य देशांबरोबरचे संबंध सुधारण इराणवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात काम करण्याचा आशावाद व्यक्त केला होता. मे महिन्यामध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रहीसी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्याने घेतलेल्या निवडणुकीमध्ये मसूद पेझेश्कियाँ निवडून आले होते.

10/13

iranusa

2018 मध्ये ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने इराणबरोबर केलेला करार मोडीत काढला होता. तेव्हापासूनच या दोन्ही देशांमधील संबंध अगदी आजपर्यंत कमालीचे ताणले गेल्याचं दिसत आहे.   

11/13

iranusa

मात्र दुसरीकडे या देशातील सरकारने मागील काही आठवड्यांपासूनच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत कोणीही जिंकलं तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही असं बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

12/13

iranusa

इराण सरकारचे प्रवक्ते फतेह मोहाजीराणी यांनी, "अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचं आमच्या देशाशी काहीही देणं घेणं नाही," असं निवडणुकीपूर्वीच म्हटलं होतं.  

13/13

iranusa

"अमेरिका आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची महत्त्वाची धोरणं आधीपासूनच ठरलेली आहेत. एकाच्या जागी दुसरं नेतृत्व आलं तरी ती बदलणार नाहीत. तसेच आम्ही यासाठी आधीपासूनच तयारी करुन ठेवली आहे," असंही इराणच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.