'मुलं शांत बसत नाहीत, दिला मोबाईल हातात' अशा पालकांची डोळे उघडण्याची वेळ आलीये! एक्सपर्ट म्हणतात...
Mobile Affects Child Eye To Brain : मुलांच्या हातात मोबाइल आता सर्रास पाहायला मिळतो. अगदी एक महिन्याच्या बाळापासून ते पाच वर्षांहून अधिक मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइलचं आकर्षण आहे. कधी त्यांना जेवताना किंवा शांत बसवण्यासाठी मोबाइल दिला जातो. पण हाच मोबाइल त्यांच्या डोळ्यांपासून अगदी मेंदूपर्यंत सगळ्याच अवयवांवर परिणाम करत आहे.
हल्ली अनेक पालक आपल्या मुलांना व्यस्त किंवा शांत ठेवण्यासाठी सर्रास मोबाइल फोन हातात दिला जातो. काही मुलं मोबाइलमध्ये गेम खेळतात तर काही मुलं यूट्यूबमध्ये व्यस्त असतात. पण या मुलांना फोनची सवय लागते यात शंका नाही. त्यामुळे तुम्ही मुलांच्या हातात फोन देत असाल तर आताच सावध व्हा. कारण मुलं यामुळे एका विशिष्ट आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. याबाबत झी चोवीस तासने डॉ. नुसरत बुखारी, एमबीबीएस बीओएमएस, आय सर्जन यांच्याशी संवाद साधला. यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया प्रत्येक पालकांनी वाचणे गरजेची आहे.
सुपर ऍक्टिव मोडमधील मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी मुलाला हातात सर्रास मोबाइल दिला जातो. यामुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो. महत्त्वाचं म्हणजे हा परिणाम नकारात्मक प्रभावाचा असतो. यामुळे अनेक आजार मुलांना होण्याचा धोका देखील अधिक असतो. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, पालक एक महिना ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना फोन दाखवतात किंवा त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मुलांना हातात फोन देतात. पण यामुळे मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत डॉक्टरांशी संवाद साधले असता त्यांनी सांगितले की लहान मुलांना फोन अजिबात देऊ नये कारण त्याचा सर्वात नकारात्मक परिणाम मुलांवर होतो.