समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी
Haji Ali Dargah Interesting Facts: ‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते.
Mumbai Haji Ali Dargah History: मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. यासह मुबंईला एक ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. यामुळेच मुंबई जगभरातील पर्यटकांचे आकर्षण देखील आहे. समुद्राच्या मधोमध असलेला चमत्कारिक हाजी अली दर्गा नेहमीच पर्टकांना आकर्षित करत असतो. मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अली दर्ग्याला सर्वधर्मीय पर्यटक भेट देत असतात. हाजी अली दर्गा हे सागरातील अलौकिक स्मारक आहे.