5 लोकांनी चुकूनही खाऊ नये 'ही' डाळ! तब्येतीवर होईल गंभीर परिणाम

Toor Daal Side Effects: घरोघरी डाळीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. स्वयंपाकात वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्यातील तूर डाळ ही ताटात असतेच. पण हीच तूर डाळ काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. 

Aug 22, 2024, 16:40 PM IST
1/7

डाळींना प्रथिनांचा चांगला स्रोत मानलं जातं. शाकाहारी असो किंवा मासांहारी तूर डाळ ही सगळ्यांना आवडते. ताटात वरण भात आणि त्यावर साजूक तूप हे दररोज आपण खात असतो.

2/7

ही डाळ खूप चविष्ट असून तिच्या सेवनाने शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते. पण ही तूर डाळ काही लोकांसाठी नुकसानदायी ठरते.   

3/7

तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या असेल तर तूर डाळ तुमच्यासाठी घातक आहे. तूर डाळ पचायला जड असते. त्यामुळे पोटदुखी, आंबट ढेकर येणे आणि गॅस तयार होणे, यासारख्या समस्या निर्माण होत्यात.

4/7

ज्यांना आधीच किडनीचा आजार आहे त्यांनी तूर डाळ चुकूनही खाऊ नये. तूर डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या अधिक वाढते. एवढंच नाही तर या डाळीचे अतिसेवन केल्याने पोटात स्टोनची समस्या होण्याची शक्यता असते. 

5/7

मुळव्याधची समस्या असल्यानेही तूर डाळ टाळावी. तूर डाळमधील प्रथिने पचणे पचनसंस्थेला खूप कठीण असतं. त्यामुळे पोटात बद्धकोष्ठता निर्माण होऊ लागते आणि व्यक्तीला सकाळी पोट साफ करण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. त्यांना सूज आणि रक्तस्त्राव यांसारख्या समस्या होतात. 

6/7

ज्या लोकांना आधीच युरिक अॅसिडचा त्रास आहे त्यांनी तूर डाळीचे सेवन बिलकुल करु नये. तूर डाळमधील प्रथिनांच्या मुबलक प्रमाणामुळे शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढवतं. त्यामुळे व्यक्तीला हातपाय दुखणे आणि सांध्यांना सूज येते. 

7/7

जर तुम्हाला तूर डाळीची एलर्जी असेल तर चुकूनही ही डाळ खाऊ नका, विशेषतः रात्री. असे केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तूर डाळीमधील प्रथिने, लोह आणि पोटॅशियम हे पोषक तत्व सहजासहजी पचत नाहीत. हेच कारण आहे की ज्या लोकांना तूर डाळीची एलर्जी आहे त्यांना ते खाणे टाळावे.