308 गर्लफ्रेंड्स, टॉप अभिनेत्रींसह अफेयर; एकाच वेळी तीन मुलींशी प्रेमसंबंध, आज आहे 300 कोटींचा मालक

Sanjay Dutt B'day: आज या सुपरस्टार अभिनेत्याचा 65 वा वाढदिवस असून त्याचे आई वडीलही दिग्गज कलाकार होते. आयुष्यात अनेक चढ उतारानंतरही तो बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. 

नेहा चौधरी | Jul 29, 2024, 09:16 AM IST
1/9

तुम्ही जो फोटो पाहत आहात तो एका मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारचा बालपणीचा फोटो आहे. हा मुलगा 40 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय असून पहिल्या चित्रपटापासूनच त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांचे आई-वडीलही त्यांच्या काळातील दिग्गज कलाकार होते. 

2/9

आम्ही बोलत आहोत सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मोठा मुलगा संजय दत्तबद्दल. बॉलिवूडमध्ये तो 'संजू बाबा' नावाने प्रसिद्ध आहे. तर मुन्नाभाईची जादू की झप्पी सगळ्यांना हवी हवीशी वाटते. 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'रेश्मा और शेरा' या चित्रपटात वयाच्या 12 व्या वर्षी त्याने बालकलाकार म्हणून काम केलं.   

3/9

बालकलाकार म्हणून पदार्पण केल्यानंतर 10 वर्षांनी संजय दत्तने 1981 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून 'रॉकी' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट खूप हिट ठरला होता, पण आई नर्गिस यांचं कर्करोगाने निधन झाल्यामुळे तो हा आनंद साजरा करु शकला नाही. त्यावेळी संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला होता.   

4/9

संजय दत्त 43 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. भरपूर प्रसिद्धीसोबतच त्यांनी भरपूर संपत्तीही कमावलीय. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, संजयची एकूण संपत्ती 300 कोटींच्या घरात आहे. तर 'संजू बाबा'च्या एका चित्रपटासाठी 8 ते 9 कोटी रुपये मानधन घेतो. 

5/9

आता संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर संजय दत्तने एक-दोन नव्हे तर तीन लग्न केलंय. त्यांचं पहिलं लग्न 1987 मध्ये अभिनेत्री रिचा शर्मासोबत झालं होतं. कर्करोगाने तिचही निधन झालं. त्यांना त्रिशला मुलगी असून ती अमेरिकेत राहते.   

6/9

1998 मध्ये संजयने रिया पिल्लईसोबत दुसरं लग्न केलं. पण 10 वर्षांनी 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्याच वर्षी, अभिनेत्याने अभिनेत्री मान्यता दत्त (दिलनवाज शेख) सोबत तिसरं लग्न केलं. आता दोघेही जुळ्या मुलांचं पालक आहेत, मुलगी इक्रा दत्त आणि मुलगा शहरान दत्त.

7/9

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंड आहेत, जे वास्तव आहे. खरं तर, संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात त्याने स्वतः 308 मुलींसोबत अफेअर असल्याची कबुली दिली आहे. 

8/9

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संजय दत्तच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा त्याचं एकाच वेळी तीन मुलींसोबत अफेअर होतं. खुद्द संजय दत्तने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. 

9/9

संजय दत्तचं नाव टीना मुनीम म्हणजे टीना अंबानी, माधुरी दीक्षित या अभिनेत्रींसह त्याच नाव जोडलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार माधुरी आणि संजय दत्त हे लग्न करणार होते. माधुरी दीक्षितच्या प्रेमात संजय दत्तने आजारी बायकोकडेही दुर्लक्ष केलं होतं असं म्हटलं जातं.