15 दिवसात बनवलेल्या या चित्रपटाने 1999 मध्ये दिली होती खळबळ उडवून, नायिकेला घाबरू लागले होते लोक

1999 Best Psychological Horror Thriller Film: ओटीटीच्या युगात, रोमान्स आणि ॲक्शन व्यतिरिक्त, लोकांना हॉरर, मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांची देखील क्रेझ आहे.

| Oct 13, 2024, 19:33 PM IST
1/5

साधारणता एखादा चित्रपट बनवायला 1 किंवा 2 वर्षे लागतात आणि पुढे तो चित्रपट रिलीज व्हायला अजून वेळ लागतो. परंतु 1999 मध्ये बॉक्स ऑफिसवर फक्त 15 दिवसात बनवलेल्या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली.

2/5

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटातील नायिकेचे एक्सप्रेशन पाहून लोक तिला घाबरायला लागले. तो 1999 चा सर्वोत्कृष्ट सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट होता. 

3/5

1999 मध्ये आलेला 'कौन?' या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत.  या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले असून चित्रपटाची कथा अनुराग कश्यप यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा फक्त तीन स्टार्सभोवती फिरते.  होय, चित्रपटात मनोज बाजपेयी, सुशांत सिंग आणि उर्मिला मातोंडकर हे तीनच स्टार आहेत. 

4/5

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. चित्रपटाची कथा एका घरात एकटी राहणाऱ्या मुलीवर आधारित होती, पण दोन पुरुष तिच्या घरात घुसतात, पण ते एक एक करून मरायला लागतात.मात्र, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सर्व लोकांना कोण मारत आहे हे समोर आले आहे. चित्रपटातील उर्मिला मातोंडकरचे एक्सप्रेशन इतके खरे वाटले की तिला पाहून लोक घाबरू लागले आणि आजही तिचे चित्रपटातील एक्सप्रेशन लोकांना घाबरवतात.

5/5

या चित्रपटाला बनवण्यासाठी अंदाजे 2.25 कोटी रुपये खर्च आला आणि जगभरात 6.83 कोटी रुपये कमावले. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला IMDb वर खूप चांगले रेटिंग मिळाले आहे, जे 10 पैकी 7.8 आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल आणि तो पाहायचा असेल तर तुम्ही तो YouTube वर पाहू शकता.