दिवाळीची साफसफाई कुठून सुरु करावी? 5 टिप्स फॉलो करा झटपट होईल क्लिनिंग

दिवाळी सणाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. तेव्हा आत लवकरच घरोघरी साफसफाईला सुरुवात होईल. संपूर्ण घराची साफसफाई करणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी एक संपूर्ण दिवस सुद्धा पुरत नाही. तसेच साफसफाई करायला मेहनत लागते ते वेगळंच. तेव्हा यंदा दिवाळीची साफसफाई  करण्यासाठी 5 टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घराची साफ सफाई झटपट होईल.   

| Oct 13, 2024, 18:33 PM IST

 

 

1/5

न वापरलं जाणार सामान वेगळं करा :

दिवाळी निमित्त साफसफाईला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम घरातील न वापरल्या जाणाऱ्या, तुटलेल्या  आणि फेकण्याजोगा वस्तू वेगळ्या करा आणि त्यांची योग्यपणे विल्हेवाट लावा. प्लास्टिक, धातू, कागदाच्या वस्तू, कपडे इत्यादी तुम्ही रिसायकल करण्यासाठी पाठवू शकता. यामुळे घरातील जागा रिकामी होईल आणि साफसफाई करण्यास सोयीस्कर होईल. 

2/5

सिलिंग फॅन आणि खिडकी दरवाजे :

दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सिलिंग फॅन, खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा. तसेच भिंतीवर कानाकोपऱ्यातील जाळ्या, धूळ स्वच्छ करा. साफसफाई करताना फरशीवरील धूळ पडते. तेव्हा घराची सर्व साफसफाई पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी फरशी पुसून घ्या. 

3/5

किचन क्लिनिंग टिप्स :

किचनचा वापर घरी सर्वात जास्त होत असतो, तेव्हा दिवाळीचा फराळ बनवण्यापूर्वी किचनची योग्य साफसफाई करावी. अनेकदा किचन टाइल्स आणि प्लॅटफॉर्म चिकट होतात. किचनची स्वच्छता करण्यासाठी ब्लीचिंग पावडर आणि डिटर्जंट वापरू शकता, ज्यामुळे किचन टाइल्स आणि प्लॅटफॉर्म सहज चमकतील. तुम्ही स्वच्छतेसाठी  बेकिंग सोडा आणि व्हिनेगर देखील वापरू शकता.

4/5

काचेची भांडी :

किचनची स्वच्छता झाल्यावर काचेची भांडी साफ करायला घ्या. काचेही भांडी अतिशय नाजूक असतात तेव्हा त्यांना साफ करताना विशेष काळजी घ्या. गरम पाणी किंवा डिटर्जेंटमध्ये थोडं मीठ टाकून तुम्ही काचेची भांडी स्वच्छ करू शकता.  

5/5

बेडरूम आणि लिव्हिंग रूम स्वच्छ करा :

सगळ्यात शेवटी तुम्ही बेडरूम आणि लिव्हिंग रूम स्वच्छ करा. खोलीतील पडदे, बेडशीट तसेच सोफा कव्हर बदला. खोलीत ठेवलेल्या सजावटीच्या वस्तू नीट स्वच्छ करा.