बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS

66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.

| Oct 13, 2024, 20:03 PM IST

Baba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.

1/11

बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS

Baba Siddique Funeral Salman Khan Crying Zishan Shilpa Shetty Emotional

बाबा सिद्दीकी सलमान खानसाठी काय होते? याचा पुरावा म्हणजे हा फोटो आहे. सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. कोमेजलेला चेहरा आणि मित्र गमावल्याचं दुःख त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

2/11

आपला सर्वात चांगला मित्र गमावल्याचे दुःख

Baba Siddique Funeral Salman Khan Crying Zishan Shilpa Shetty Emotional

सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड शेराही दिसला.त्याच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्तही दिसत होता. मात्र भाईजानच्या चेहऱ्याकडे पाहून सर्वांच्या नजरा खिळल्या. सलमानचा चेहरा आपला सर्वात चांगला मित्र गमावल्याचे दुःख लपवू शकत नव्हता.

3/11

झीशान

वडील गमावल्याचे दु:ख शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान वडिलांना गमावल्यानंतर दु:खी झाला आहे. त्याचा हा फोटो पहा.

4/11

सना खान

सना खान पती मुफ्ती अनससोबत बाबा सिद्दीकी यांच्या घरी पोहोचली. सनाने हिजाब परिधान केला होता. आणि घरातून बाहेर पडताना ती अश्रू पुसताना दिसली. तर तिचा पती अनस तिची काळजी घेताना दिसत होता.

5/11

टीव्ही अभिनेत्री माही विज बाबा

टीव्ही अभिनेत्री माही विज बाबा सिद्दीकी यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आली होती. यावेळी ती भावूक झालेली दिसली.

6/11

करण सिंग ग्रोवर

टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोवर पांढरा टी-शर्ट आणि काळा सैल पायजामा घालून बाबा सिद्दीकी यांच्या घरी जाताना दिसला. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांची गर्दी पहा.

7/11

अभिनेता झहीर इक्बाल

सोनाक्षी सिन्हाचा पती आणि बॉलिवूड अभिनेता झहीर इक्बाल पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान करून बाबा सिद्दीकी यांच्या घरी पोहोचला. हा फोटो पहा.

8/11

युलिया वंतूर

युलिया वंतूर पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि काळ्या रंगाचा दुपट्टा परिधान करून बाबा सिद्दिकीच्या घरी जाताना दिसली.

9/11

अर्पिता खान

तर सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान भाऊ सोहेल खानसोबत बाबा सिद्दीकी यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पोहोचली.

10/11

शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया

शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर दिसले.

11/11

सूरज पांचोली आणि पूजा भट्ट

सूरज पांचोली आणि पूजा भट्टही बाबा सिद्दीकी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आली होती.