Somvati Amavasya 2024: वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुळशीला अर्पण करा 'ही' गोष्ट, लक्ष्मी होईल प्रसन्न

सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? जाणून घ्या सविस्तर    

| Dec 29, 2024, 14:02 PM IST
1/7

वर्षातील शेवटची अमावस्या

2024 मधील शेवटची अमावस्या सोमवार 30 डिसेंबर रोजी असणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष अमावस्या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. 

2/7

सोमवती अमावस्या

परंतु, यावर्षी पौष अमावस्या ही सोमवारी येत असल्यामुळे हा दिवस सोमवती अमावस्या म्हणून ओळखला जाणार आहे. 

3/7

तुळशीची पूजा

ज्योतिषांच्या मते, अमावस्येला तुळशीची पूजा केली जाते. या दिवशी तुळशी मातेला कोणती वस्तू अर्पण करावी. जाणून घ्या सविस्तर 

4/7

लाल रंगाचा धागा

सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा धागा बांधा. यामुळे जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहिल.   

5/7

चुनरी

त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी तुळशीला जर तुम्हील लाल रंगाची चुनरी अर्पण करा. यामुळे जीवनात ऐश्वर्य आणि समृद्धी येते असे म्हणतात.   

6/7

कच्चे दूध

सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशी पुढे दिवा लावून कच्चे दूध अर्पण करा. तसेच या दिवशी तुळशीसमोर प्रार्थना देखील करा. 

7/7

श्रृंगाराच्या वस्तू

सोमवती अमावस्येच्या दिवशी पिवळ्या धाग्यात108 गाठी बांधून तुळशीला बांधा आणि त्यानंतर प्रार्थना करा. तसेच तुळशीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)