अज मैं मूड बना लेया...! Amruta Fadanvis यांची टॉप 5 गाणी, पाहा किती व्ह्यूज मिळालेत

Amruta Fadanvis Song : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या सोशल मीडियावर (Social Media) चांगल्यात सक्रिय असतात. विविध विषयांवर सोशल मीडियात त्या आपलं मत व्यक्त करत असतात. पण त्याच बरोबर त्या एक उत्तम गायिका देखील आहेत. अमृता फडणवीस यांचं नवं गाणं काल रिलीज झालं (Amruta Fadanvis New Song Release). गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्याची चर्चा होती. अखेर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला  आलं आहे. आता हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण त्याचबरोबर गाण्यातील अमृता फडणवीस ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे. 

Jan 07, 2023, 15:50 PM IST
1/5

बॅचलर पार्टीतील कथानकावर हे गाणे आधारित असून 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' असे या गाण्याचे बोल आहेत. आपल्या नव्या गाण्यात अमृता फडणवीस या वेगवेगळ्या लूकमध्ये पाहिला मिळत असून त्यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला तब्बल एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

2/5

याआधी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अमृत फडणवीस यांनी गाणं गायलं होतं. फिर से... फिर से असं या गाण्याचे बोल होते.  या गाण्याला तब्बल 5 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. 

3/5

अमृता फडणवीस यांच्या शिव तांडवमधील लुकची सर्वाधिक चर्चा झाली होती. कुरळे केस आणि भगव्या ड्रेसमधील अमृता फडणवीसांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 'शिव तांडव स्रोतम' या गाण्याला 13 लाख व्ह्यूज मिळाले होते.

4/5

'ये नयन डरे डरे' या गाण्यात अमृता फडणवीस यांनी रेड कलरचा गाऊन घातला आहे. या गाण्याची खूप चर्चा झाली होती. या गाण्यातील अमृता फडणवीसांचा लुकही सर्वांना आवडला होता. या गाण्याला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते

5/5

कोरोनाच्या काळात आलेल्या गणेश वंदना या गाण्यात अमृता फडणवीस या महाराष्ट्रीयन घराघरात असलेल्या अस्सल मराठमोळ्या पेहेरावात दिसल्या. या गाण्याला 60 लाखांहून अधिक व्ह्यूज होते.