Mumbai Marathon News : मॅरेथॉन स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा Mumbai चे Spirit दिसले. (Mumbai Marathon 2023) थंडी असताना तब्बल 55 हजार लोक या स्पर्धेत सहभागी होत धावलेत. (Tata Mumbai Marathon) मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबईकरांनी 'हर दिल मुंबई' चा नारा देत धावायला सुरुवात केली. (Mumbai Marathon News in Marathi) मुंबई मॅरेथॉनचा ब्रॅन्डअॅम्बेसिडर अभिनेता टायगर श्रॉफ उपस्थित होता. (Mumbai Marathon 2023 Results)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत मोठा उत्साह आणि ऊर्जा दिसत आहे. जगातील सर्वात मोठी मरेथॉन आहे. 250 अधिक सामाजिक संस्थांचा सहभाग नोंदवला आहे.तरुण, वृद्ध, दिव्यांग सर्वांचा सहभाग आहे. तसेच जगभरातील धावपटू सहभागी होत आहेत. कोव्हिडनंतर दोन वर्षांनी स्पर्धा होत असल्याने लोकांमध्ये उत्साह आहे. 57-58 हजार स्पर्धक सहभागी झाले असून पोलीस, प्रशासनाकडून उत्तम व्यवस्था झाली आहे, असे सांगत मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांचे कौतुक केले. तसेच त्यांनी आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले.
मुंबईत आलेल्यांचे स्वागत, मुंबईचं स्पिरिट दिसते आहे.आम्ही दावोसला जाणार आणि चांगली गुंतवणूक राज्यासाठी आणणार आहोत. मुंबई आयुक्त चहल स्वतः धावले त्यांचे अभिनंदन आहे. या मरेथॉनची लोक वाट पाहत असतात. उत्साह आणि ऊर्जा पाहून आनंद वाटला. 55 हजार लोक सहभागी झाले पण कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही, त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आहेच, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
#WATCH | Maharashtra: TATA Mumbai Marathon begins from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, in Mumbai (CSMT) pic.twitter.com/PbvNjQr9jx
— ANI (@ANI) January 15, 2023
मुख्यमंत्री शिंदे यांनी बंदुक हवेत झाडून ड्रीम रनला सुरुवात केली. तर त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनिअर सिटीझन गटाच्या मरेथॉनला झेंडा दाखवला. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले की, मी आत्तापर्यंत सर्व मुंबई मॅरेथॉन धावलो आहे. ही 18 वी मुंबई मॅरेथॉन आहे. पूर्ण सहकार्य करत आहोत. शो मस्ट गो ऑन. मॅरेथॉन रस्ता, लायटींग, सफाई केली आहे, आयोजकांना आम्ही सहकार्य केले आहे.
1 ) मुरली गावित, प्रथम क्रमांक (01.05.20)
2) अंकित देशवाल, द्वितीय क्रमांक (01.05.48)
3) दीपक कुंभार, तृतीय क्रमांक (01.05.51)
1) गोपी थॉनक्कल, प्रथम क्रमांक (02.16.41)
2) मान सिंग, द्वितीय क्रमांक (02.16.58)
3) कालिदास हिरवे, तृतीय क्रमांक (02.19.54)
1) हायले लेमी, प्रथम क्रमांक (02.07.32) इथिओपिया
2) फिलेमॉन रोनो, द्वितीय क्रमांक (02.08.44) केनिया
3) हैलू झेवडू, तृतीय क्रमांक (02.10.23) इथिओपिया