Gautami Patil Dance Show in Nashik: सबसे कातील, गौतमी पाटील... महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील हिने (Gautami Patil) आपल्या अदाकारीने अवघ्या सगळ्यांनाच घायाल केले आहे. फक्त पुरुष मंडळीच नाही तर महिलावर्ग देखील गौतमीचा चाहता झाला आहे. पुरुषांप्रमाणेच महिला देखील गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी करत आहेत. नाशिक येथे गौतमीचा कार्यक्रम होत आहे. गौतमीच्या या कार्यक्रमासाठी एकाच वेळी 700 महिलांनी बुकींग केले आहे. या कार्यक्रमासाठी महिलांना 40 टक्के सवलत देण्यात आली.
गौतमी पाटीलचा नाशिक शहरात लेडिज स्पेशल शो रंगणार आहे. कारण, नाशिकमधल्या आजच्या कार्यक्रमाला महिलांना तिकीटांत 40 टक्के सूट देण्यात आली आहे. महिला आणि युवतींच्या प्रचंड मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. रुग्णवाहिका निधी संकलनासाठी हा कार्यक्रम ठक्कर डोमवर आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी 700 सीट्स फक्त महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दीडशेपेक्षा जास्त युवतींनी ग्रुप बुकिंग केले. तेव्हा युवती आणि महिलांच्या प्रतिसादामुळे नाशिकचा कार्यक्रम अनोखा ठरणारअशी चर्चा रंगली आहे.
गौतमीच्या अदा आणि डान्स शोची भुरळ सगळ्या महाराष्ट्राला पडलीय. अख्खं मार्केट तिनं जॅम करून टाकल आहे. मात्र, बीडकरांचा नादच खुळा. किरण गावडे नावाच्या बीडच्या एका तरुण उद्योजकानं आपली बायको प्रगती हिच्या बड्डेनिमित्त चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला. तो देखील बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी. गावडेंची ही प्रगती महाराष्ट्राला थक्क करून टाकणारी आहे. आमदार सुरेश धस यांना देखील हे कार्यक्रम पाहण्याचं निमंत्रण होतं त्यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी आणि पत्नीच्या सांगण्यावरून आपण नृत्यांगना गौतमी पाटील हिला आपल्या गावामध्ये आणल्याचं किरण गावडे यांनी सांगितले.
पैलवानाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारीवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारीवर बेफान होऊन नाचले. तर, काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढले होते. यावेळी अनेक गाळ्यांचे पत्रे फुटले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला.