www.24taas.com, धनंजय शेळके, असोसिएट प्रोड्युसर, झी २४ तास
नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी आम आदमी पार्टीवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली... या टीकेमागची कारणं काय आहेत ? याचा हा आढावा....
सुरवातीला आपण आदमीवरच्या टीकेबद्दल बोलू.... राज यांनी आम आदमी पार्टीवर बोलताना महाराष्ट्रात आपची गरज नाही किंवा त्यांना इथे स्कोप नाही आम्हीच इथले बाप आहोत असं सांगितलं. याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात असलेली राजकीय स्पेस भरुन काढण्याच्या मनसेच्या मनसुब्यांना आप मुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे त्यांनी ही टीका केली असवी. मनसेच्या स्थापनेपासून २००९ ची लोकसभा तसंच विधानसभा आणि त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत किंवा आपण असं म्हणू की आम आदमी पार्टीची स्थापना होऊन त्यांचं दिल्लीत सरकार येईपर्यंत महाराष्ट्रात विरोधी पक्षांची स्पेस मनसे भरुन काढत आहे असं चित्र निर्माण केलं जात होतं. त्यात काही प्रमाणात तथ्थही होतं. मात्र आम आदमी पार्टीनं दिल्ली काबीज केल्यानंतर देशभरात त्यांची जी एक प्रकारची हवा निर्माण झाली आहे. त्यामुळं मनसेला आपण अडगळीत पडतो की काय अशी भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी ही टीका केलेली असावी.
२००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असो किंवा २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका असो राज ठाकरेंच्या भाषणांना मोठा प्रतिसाद मिळायचा. (कदाचित तो आताही मिळेल.) त्यांच्या भ्रष्टाचार विरोधातील भाषणांनी तरुण वर्गाला आणि मराठी मतदाराला चांगलीच भुरळ घातली. त्यामुळे त्यांचे १३ आमदार निवडूण आले. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाखाच्या पुढे मते घेतली. नाशिक मनपात सत्ता आली. मुंबई, पुणे, कल्याण डोंबिवलीत ते सत्तेच्या जवळ गेले किंवा किंवा प्रमुख विरोधी बनले. मात्र मनसेच्या लोकप्रतिनीधींच्या कामगिरीकडे बघितल्यास इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांनी वेगळं काहीच केलं नाही. नाशिकची जनता मनसेच्या महापालिकेतल्या कामगिरीवर प्रचंड नाराज आहे. तीच परस्थिती पुण्यात आहे. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत जवळपास तेच चित्र आहे. त्यांच्या आमदारांनहीही काहीही लक्षवेधक कामगिरी केली नाही. शेतक-यांच्या उसाचा प्रश्न असो, जलसिंचन विभागातील भ्रष्टाचार असो, आदर्श प्रकरण असो किंवा राज्यातील इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं असो.. ग्रामीण भागात शेतक-यांची वीज कनेक्शन तोडली जात होती. त्यावरीही मनसेचा आमदार किंवा पक्ष म्हणनू काही भूमिका घेतली नाही. किंवा शेतक-यांच्या बाजूने मनसे कधी रस्त्यावर आल्याचं दिसलं नाही.
भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणं सोडा... सर्वसामानांन्याना पावलोपावली तोंड द्यावे लागणा-या सरकारी कार्यालयातल्या भ्रष्टारामुळं सर्वसामान्य चांगलेच पिचले आहे. त्यावर मनसेकडून काहीच होताना दिसत नाही. जेव्हा राज ठाकरे महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो असं म्हणत होते. तेंव्हा सर्वसामान्यांना हा सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार राज संपवतील असं वाटतंत होतं. तो संपला तर नाहीच. मनसेनं त्यादृष्टीनं काही प्रयत्नही केले नाहीत. यासाठी महाराष्ट्राची सत्ताच हवी असे नाही. किमान या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन तरी उभा करु शकली असती. मात्र ते झाले नाही. त्यामुळंच मनसेचे कार्यकर्तेही इतर पक्षांसारखेच वाटत आहेत. ( तोडफेड करणे, एखाद्याला मारहाण करणे किंवा एखाद्याचा तोंडाला काळं फासणे याशिवाय). केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका करुन आता मते मिळणार नाहीत. लोक हुशार झाले आहेत. तुम्ही निवडून आल्यावर काय करणार आहोत याचं उत्तर त्यांना हवं आहे. राज ठाकरेंनी तसा कोणताही कार्यक्रम पक्षाला दिला नाही. त्यांच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लू प्रिंट पक्ष स्थापनेपासून नुसतीच चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडून भ्रमनिरास झाला आहे असं आम आदमीला आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या मराठी माणसाला वाटतंय. हा आम आदमी आत आम आदमी पक्षाकडं आशेन पाहू लागला आहे. त्यामुळं राज ठाकरेंनी आम आदमी पक्षावर टीका केली असावी.
आजपर्यंत मोंदीचे गुणगाण करणा-या राज यांनी मोदींवरही टीका केली. म्हणे मोदींनी पंतप्रधान पदाचा उमेदवार झाल्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. खरंतर मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड होऊनही अनेक दिवस झाले. आत्तापर्यंत ते मोदींवर हे बोलू शकले असते. उठसूठ कुठल्याही किरकोळ कारणांसाठी किंवा उद्धव ठाकरे काही बोलले की त्याला उत्तर द्याला लगेच प्रेस घेणारे राज ठाकरे यासाठीही प्रेस घेऊन यापूर्वीही हे बोलू शकले असते. मात्