ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत कांगारूंकडून व्हाइटवॉश मिळाल्यानंतर विश्वविजेती टीम इंडिया वन डेत काही तरी दिवे लावेल असे वाटत होते. मात्र, वन डेतही माती खात लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे वेध टीम इंडियाला लागेल आहेत. कागदावर वाघ असणारे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात गवत खातांना पाहिल्यावर भारतीय क्रिकेट रसिकांची तळपायाची आग मस्तकात जात आहे. हे असे का होत आहे, याचं कारण काय असे एक ना अनेक प्रश्न क्रिकेट रसिकांना सतावत आहेत. याचं मोठं आणि आर्थिक कारण आयपीएलमध्ये दडलं आहे. त्यामुळे भारताला सीबी सिरिजची फायनलचं खेळण्यात स्वारस्य नाही.
आता बोनस गुणासह भारत फायनलमध्ये जाणार अशी भाबडी आशा क्रिकेट रसिकांना वाटत आहे. परंतु, असे होणार नाही याची मला खात्री आहे. या मालिकेत श्रीलंकेने जो खेळ दाखवला आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियासोबत फायनल खेळण्याची खरी लायकी श्रीलंकेची आहे. मायदेशी जाण्यापूर्वी झुंज दिली,मानहानीकारक पराभव पत्करून परतलो नाही, असे दाखविण्यासाठी आजचा विजय हे उत्तम उदाहरण सांगता येईल. तसेच, या विजयामुळे खेळाडूंचे दोन फायदे झाले. एक तर बऱ्याच काळासाठी क्रिकेट रसिकाचे शिव्या शाप मिळणार नाही. तर दुसरा फायदा जाहिरातदारही यातील काही खेळाडूंची पाठ सोडणार नाही. म्हणजे आता फायनलमध्ये पोहचले नाही तर उजळ माथ्याने हे खेळाडू मायदेशी येवू शकतात हे नक्की...
आयपीएलच्या जाहिरातीचं अर्थकारण
येत्या ४ एप्रिलपासून आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी टीम इंडियातील खेळाडूंसह जगभरातील इतर धुरंधर फलंदाज आपली अस्त्र पारजून तयार आहेत. आयपीएल
म्हणजे पैशांचा बाजार! यात सगळीकडे पैसाच पैसा आहे. हीच पैशाची ओढ टीम इंडियाला मायदेशी लवकर परतायला कारणीभूत ठरते आहे.आयपीएलच्या सध्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यात कुठेही भारतीय खेळाडू नाहीत. आता सीबी सिरीज संपल्यावर ढाक्यात आशिया कप आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंना जाहिरातींची असाइंमेंट करण्यासाठी फारच कमी वेळ आहे. त्यामुळे आता फायनल न खेळता लगेच भारताकडे कूच केली तर जाहिराती पदरात पडतील आणि या ‘गरीब’ खेळाडूंच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटेल, असे एकंदरीत चित्र आहे.
डागाळलेला इतिहास
यापूर्वी २००९मध्ये धोनी आणि हरभजनसिंग यांनी प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याऐवजी जाहिरातींची शुटिंग करणे पसंत केले होते. धोनी आणि हरभजनसिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्याचे वितरण राष्ट्रपती प्रतिभा पाटील या