रोहित गोळे
rohit.gole@zeenetwork.com
आज काल नामांतर या विषयावर फार मोठ्या प्रमाणात राजकारण होतयं त्या विषयी थोडं.... सर्वप्रथम नामांतर याही पेक्षा मला १ महत्वाचा मुद्दा वाटतोय, तो साऱ्यांनी लक्षात घ्यावा....कोणतीही सामान्य व्यक्ती या नामांतराविषयी कधीच मागणी करत नाहीये, ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. यात राष्ट्रवादीची फार छान अशी भेदनीती आहे. कारण की जेव्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती या एकत्र आल्या त्या बरोबरच हा मुद्दा अगदी जोमाने उचलून धरला गेला.
आज सामान्य माणूस हा अगदी लहान सहान गोष्टीने त्रासून गेला आहे, त्याला या साऱ्या पेक्षा सुद्धा मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी झगडावं लागतं आहे. ही आजची खरी शोकांतिका आहे. त्यामुळे नामांतरापेक्षा दादर या भागाचा किवा स्टेशन परिसरातील सुखसुविधा कशा प्रकारे वाढवता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दादर स्टेशन परिसरातील वाढती गर्दी त्यांना अपुरे पडणारे रस्ते, ब्रिज यांचा विचार करणं आणि त्यावर योग्य अशी उपाययोजना करणं यांना प्राथमिकता देणं हे आद्य कर्तव्य आहे...
अनेक नागरिकांना या नामांतराविषयी काही घेणं देणं नाहीये.... अनेकांना नामांतर हे कशाशी खातात हे देखील माहित नाही. म्हणजेच या नामांतरावर झुंजण्यापेक्षा काही समाजोपोयोगी कामं होतील का यावर लक्ष केंद्रित करावं, याचा अर्थ असं नाही की मी बाबासाहेब यांच नाव देणार म्हणून विरोध करतोय... तर मित्रानो तसं नाहीये हि बाब लक्षात घ्यावी.. पण जी गोष्ट करण्यामुळे जर एकही व्यक्ती संतुष्ट होणारच नाही तर त्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा साफ चुकीचं आहे...
म्हणजेच सगळ्यांना आज सोई सुविधा हव्या आहेत याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा... माझं मत हे अगदी बरोबर असेल असं नाहीये पण कृतीशील दृष्टीतून विचार करता ते मला योग्य वाटतंय....