विना पासवर्ड पण ओपन होते तुमचे फेसबुक!

 काय तुम्हांला माहीत आहे का काही जणांना तुमचे फेसबूक अकाउंटमध्ये साइन इन साठी पासवर्डची गरज नसते. वास्तवात फेसबूकच्या काही कर्मचाऱ्यांना विना पासवर्ड कोणाचेही फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा मिळाली आहे. 

Updated: Mar 4, 2015, 04:44 PM IST
विना पासवर्ड पण ओपन होते तुमचे फेसबुक! title=

न्यू यॉर्क :  काय तुम्हांला माहीत आहे का काही जणांना तुमचे फेसबूक अकाउंटमध्ये साइन इन साठी पासवर्डची गरज नसते. वास्तवात फेसबूकच्या काही कर्मचाऱ्यांना विना पासवर्ड कोणाचेही फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा मिळाली आहे. 

'वेंटरबीट'नुसार फेसबूकने नुकतेच स्पष्ट केले की अशा प्रकारे विना पासवर्ड फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा ही अनेक स्तरांची तसेच अत्यंत शिस्तीची आणि ग्राहकाला सहकार्य करण्याची प्रक्रिया आहे. या वेळी कोणीही विश्वासाचे उल्लंघन केले तर कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्यात येते. 

वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये फेसबूक प्रवक्त्याचा हवाला देताना सांगितले की, कोणाचेही फेसबूक खाते ओपन करण्याचे स्वातंत्र्य अनेक स्तरांवर दिले जाते. पण असे काही ठराविक कामासाठी केले जाते. ठराविक कर्मचारी आपल्या कार्यासंबंधात कोणाचेही खाते ओपन करू शकतात. पण यात त्या कामासंबंधीच माहिती ते मिळवू शकतात. 

त्यांनी पुढे सांगितले की, संशयास्पद व्यवहारांची तपास करण्यासाठी अशा प्रकारच्या दोन प्रणाली तयार करण्यात आल्या आहेत. यातून आठवड्याचा एक रिपोर्ट तयार करतात. दोन स्वतंत्र सुरक्षा टीम या रिपोर्टची पुनर्समिक्षा करतात. अनुचित व्यवहार आणि नियमांचे उल्लंघन झाले तर त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत त्याला तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात येते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.