सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 14, 2016, 11:07 AM IST
सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी title=

मुंबई : मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

आजच्या जगात मोबाईल शिवाय राहणं, याची साधी कल्पनाही आपण करु शकत नाही. मोबाईलमुळे आपण अपडेट राहतो, जगातल्या कानाकोप-यात काय घडतंय ते आपल्याला कळतं, सोशल मीडियामुळे मित्रांशी, नातेवाईकांशी आपण जोडलेलो असतो मात्र या सर्व गोष्टींचा जितका फायदा तितकच नुकसानही आहे. या मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकांना आपल्या जॉब्सला मुकावं लागलंय. कामावर असताना, मोबाईलचा अतिरिक्त वापर केल्यानं आणि त्यामुळे कामात लक्ष नसल्यामुळे आणि चुका झाल्यामुळे अनेकांवर आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या.

तरुणांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं. कामावर मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक चुका होतात, प्रोडक्टीविटी कमी होते आणि कंपनीचं नुकसान होतं. या गोष्टी टाळण्यासाठी आता अनेक कंपन्यांनी आपल्या ऑफिसमध्ये मोबाईल जॅमर बसवण्यास सुरुवात केलीय. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आता कामावर येतांना मोबाईल बाहेर जमा करण्याची सक्तीही करण्यात आलीय. यामुळे कंपनीचं होणार नुकसान थांबणार असून तरुणांनाही मोबाईलच्या व्यसानापासून दूर राहण्यास मदत होईल.

तरुणांमध्ये मोबाईलचं वेड हा एक मानसिक आजार असल्याचं समोर आलंय. याला कंपल्सीव डिसॉर्डर किंवा सोशल मीडिया ऍडिक्शन असं म्हणतात. रस्त्यावर मोबाईल वापरल्यामुळे अनेक अपघात झालेलेही आपण पहातो, ऐकतो. मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे नातेसंबंधांवरही त्याचा विपरीत परिणाम झालेला पहायला मिळतोय आणि हे सर्व रोखण्यासाठी गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्यावा.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो आणि त्यामुळे मोबाईलचे असंख्य फायदे असले तरी त्याच्या दुष्परिणामांपासून स्वत:ला दूर ठेवणं हेही आपल्याच हाती आहे.