केवळ १७०० रुपयांत घरी घेऊन जा नवा कोरा 'आयफोन ७'!

आयफोनची क्रेझ सध्या बाजारात आणि तरुणाईवर झिंगलेली दिसतेय. अनेक जणांचा आपल्याकडे आयफोन हवाय, हा हट्टच आहे. 

Updated: Sep 14, 2016, 11:43 AM IST
केवळ १७०० रुपयांत घरी घेऊन जा नवा कोरा 'आयफोन ७'! title=

मुंबई : आयफोनची क्रेझ सध्या बाजारात आणि तरुणाईवर झिंगलेली दिसतेय. अनेक जणांचा आपल्याकडे आयफोन हवाय, हा हट्टच आहे. 

नुकताच, आयफोन ७ हा नवा कोरा स्मार्टफोन लॉन्च झालाय. भारतात हा स्मार्टफोन लवकरच उपलब्ध होणार आहे. या फोनची भारतात किंमत जवळपास ६०,००० च्या घरात असणार आहे. 

ही किंमत प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल अशी नाही. त्यामुळे, कंपनीनं एक शक्कल लढवलीय. 

हा फोन महाग असला तरीही तो तुम्हाला केवळ १७०० रुपयांमध्ये घरी घेऊन जाता येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी अॅपल कंपनीची भारतीय बँकांशी याच संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासाठी फोन विकत घेतेवेळी तुम्हाला तुमचं आधार कार्ड सादर करणं गरजेचं असेल.

भारतात गणपती, दसरा, दिवाळी अशा विविध सणांचा उत्साह सुरू झालाय. हाच उत्साह एन्कॅश करण्याचा कंपनीचा प्रयत्न राहील.