नवी दिल्लीः भारतीय बाजारात चीनच्या शिओमी कंपनीच्या मी-थ्री या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनी रेडमी वन-एस हा नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 26 ऑगस्ट 2014ला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होऊ शकतो.
या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन बाजारात आल्यानं याचा परिणाम मोटो-ई, मायक्रोमॅक्स, सॅमसंग आणि इतर स्मार्टफोनवर होणार आहे.
शिओमी रेडमी वन-एसची वैशिष्टेः
डिस्प्ले- 4.70 इंच 720x1280 पिक्सल
प्रोसेसर- 1.6 गीगाहर्ट्स कॉडकोर स्नॅपड्रॅगन 400, अॅडरेनो 305 जीपीयू
रॅम- 1 जीबी
अँड्रॉईड- 4.3 जेली बीन
कॅमेरा- 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
मेमरी- 8 जीबी इंटरनल, 64 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
बॅटरी- 2000 मेगाहर्ट्झ
कनेक्टिविटी- थ्री-जी, एडीजीई, जीपीआरएस, वाय-फाय, ब्लू टूथ 4.0
किंमत- 6,999 रुपये
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.