नवी दिल्ली: जिओमीनं जेव्हा भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन रेडमी १एस बाजारात लॉन्च केला. तेव्हा Mi3ची विक्री बंद केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच Mi3ची भारतात विक्री सुरू होणार आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये कंपनीचे हेड मनु जैन यांनी याबद्दल माहिती दिली.
जैन यांनी याबद्दल खूप माहिती दिली नाही, पण Mi3ला दिवाळी दरम्यान बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. मात्र किती हँडसेट विक्रीसाठी आणणार हे नक्की नाहीय. सुरुवातीला जिओमीनं २० हजार हँडसेट बाजारात आणले होते.
जे ग्राहक हा फोन खरेदी करण्यासाठी सतत प्रयत्न करत होते, पण त्यांना फोन मिळाला नाही. त्यांच्यासाठी खास ‘जिओमी प्रायोरिटी पास’ विक्री कॅम्पेन लॉन्च करणार आहे. ग्राहकांसाठी स्पेशल प्रायोरिटी सेल असेल, ज्यात फोन ऑटोमॅटिकली फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना फक्त बिलिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
बर्रा यांनी पुढं सांगितलं की, रेडमी १एसचं रिटर्न मूल्य १ टक्का असू शकतो. भविष्यात जिओमी भारतीय इंजिनिअर्सला हायर करू शकतो. जेणेकरून यूजर इंटरफेसला आणखी उत्तम केलं जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.