'मी-3' हा 'चीनी ड्रॅगन' खिसा कापेल, की पैसे वाचवेल?

शाओमी ही चीनी मोबाईल कंपनी आहे, या कंपनीचा मी-3 भारतात आल्याने, भारतात घट्ट पायरोऊन बसलेल्या परदेशी कंपन्यांनी धसका घेतलाय. कारण मी-3 मध्ये दोन ते अडीच पट पैस वाचवून, बड्या स्मार्ट फोन कंपन्यांच्या मोबाईल सारखे फीचर्स मिळणार आहेत.

Updated: Jul 17, 2014, 05:36 PM IST
'मी-3' हा 'चीनी ड्रॅगन' खिसा कापेल, की पैसे वाचवेल? title=

मुंबई : शाओमी ही चीनी मोबाईल कंपनी आहे, या कंपनीचा मी-3 भारतात आल्याने, भारतात घट्ट पायरोऊन बसलेल्या परदेशी कंपन्यांनी धसका घेतलाय. कारण मी-3 फोन घेतला, तर दोन ते अडीच पट पैस वाचणार आहेत, तसेच बड्या स्मार्ट फोन कंपन्यांच्या मोबाईल सारखे फीचर्स मिळणार आहेत.

मी-3 भारतात आलाय, या फोनची बुकिंग आणि विक्री फक्त फ्लिपकार्टवर होणार आहे. बुकिंगनंतर हा फोन 22 जुलैपासून ग्राहकांना देण्यात सुरूवात होणार आहे.

चीनचा ऍपला फोन म्हटला जाणाऱ्या मी-3 ची फक्त ऑनलाईन विक्री

शाओमी कंपनीचं वय अवघं चार वर्षे आहे. 'चीनचा ऍपल' अशी ओळख असलेल्या या फोनच्या कंपनीची स्थापना, गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि मोटोरोला कंपनीत काम केलेल्या इंजीनिअर्सने केली आहे.

कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट ह्युगो बॅरा याच्या मते, कंपनीचा उद्देश लोकांपर्यंत सर्वोत्कृष्ट उत्पादन आणि सर्व्हिस पोहोचवणे हा आहे. जेव्हा ग्राहक फोन खरेदी करतील, आणि फोन बॉक्समधून बाहेर काढतील, फोन वापरतील तेव्हा शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे.

शाओमी कंपनीत येण्याआधी ह्युगो बॅरा हे गूगल एंड्रॉएडचे व्हाईस प्रेसिडेंट होते.

स्नॅपड्रॅगन क्वाडकोर प्रोसेसर आणि दोन जीबी रॅम मी-3 मध्ये असणार आहे, यामुळे या फोनचं हार्डवेअर शक्तीशाली मानलं जातंय.

किंमत कमी तरीही भारतात 'चायना मेड'

या फोनची किंमत 13 हजार 999 रूपये आहे, नेक्सस-5 पेक्षा मी-3 अनेक बाबतीत पुढे आहे, फक्त यात 4जी सुविधा नाही.

नेक्ससला गुगलचा फोन म्हटलं गेलं, त्यामुळे फायदा झाला मात्र शाओमीला भारतात असा कोणताही फायदा होतांना दिसत नाहीय, उलट एक चीनी कंपनीचा 'चायना मेड' म्हणून शाओमीकडे पाहिलं जातंय.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरच मी-3 ची विक्री होतेय, दुकांनावर का नाही हा प्रश्न मात्र कायम आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग शाओमी जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचेल का? हे प्रश्न चिन्हही कायम आहे. मात्र फ्लिपकार्टचे सीईओ सचिन बन्सल यांच्या मते या फोनची ऑनलाईनने हातोहात विक्री होईल.

फक्त 20 शहरात सर्व्हिस स्टेशन्स

सचिन बन्सल पुढे म्हणतात, "भारतात ई-कॉमर्सचा बाजार वेगाने वाढतोय, जास्तच जास्त लोक ऑनलाईन सामान खरेदीवर भर देतांना दिसून येत आहेत, आणि हा ट्रेंड कायम असेल असं मला वाटतं".

मात्र ऑफ्टर सेल सर्व्हिससाठी, कंपनीने सध्या फक्त 20 शहरात आपले सर्व्हिस सेंटर सुरू केले आहेत. मात्र भारतात फक्त 20 सर्व्हिस सेंटर असल्याने ग्राहकांची नाराजी वाढू शकते. मात्र व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात, लवकरच भारतात आणि सर्व्हिस सेंटर सुरू करू.

चीनमध्ये 'मी-4' मग भारतात 'मी-3' का?

आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा चीनमध्ये मी-4 लॉन्च होतोय, तेव्हा भारतात मी-3 लॉन्च केला जातो. हा चीनमध्ये जुना झालेला फोन आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मी -3 आणि सॅमसंग एस 5

फीचर्स & हार्डवेअर

मी-3 शाओमी 

 सॅमसंग एस 5

प्रोसेसर

स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर 2.3 GHz

एडोनिस प्राइम 2 , (क्वाड 1.9 GHz + क्वाड 1.3 GHz)

रॅम 

 2 जीबी  

2 जीबी

ऑपरेटिंग -सिस्टम                      

एंड्राएड 4.4 वर

एमआययूआरआय इंटरफेस

एंड्राएड 4.4

मेमरी   

16 जीबी ( कार्ड स्लॉट नाही)

16.32 जीबी (128 जीबीपर्यंत एक्सटर्नल कार्ड)

प्रायमरी कॅमेरा

13 मेगापिक्सेल, सोनी सेंसर लेन्स, 1080 पी एचडी व्हिडीओ

16 मेगापिक्सेल, सोनी सेन्सर लेन्स, 2160 पी एचडी व्हिडीओ

बॅक कॅमेरा 

2 मेगापिक्सेल  

2 मेगापिक्सेल  

ग्राफिक्स 

330 एड्रीनो  

330 एड्रीनो  

स्क्रीन

 5 इंच एचडी आयपीएस 

5 इंच ऐमोलेड, गोरिल्ला ग्लास 3 

नेटवर्क

3 जी

3 जी, 4 जी

बॅटरी 

3050 एमएएच

2800 एमएएच

किंमत

किंमत 14 हजार 

36 हजार ( 16 जीबी)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.