दुबई : दुबईच्या रस्त्यांवर सध्या जगातली सगळ्यात महागडी कार फिरत आहे. या कारच्या किमतीमध्ये तब्बल 1500 बीएमडब्ल्यू विकत घेता येतील एवढी ही कार महाग आहे. लॅम्बॉर्गिनी एव्हेनटेडर LP700-4 असं या कारचं नाव आहे. ही जगातली पहिली गोल्ड प्लेटेड कार आहे.
या गाडीसाठी तब्बल 500 किलो सोनं वापरण्यात आलं आहे. या गाडीची किंमत 7.5 मिलीयन अमेरिकन डॉलर म्हणजेच 502 कोटी रुपये एवढी आहे. पहिल्या दोन मिनिटांमध्येच ही कार 100 किमीपर्यंतचा वेग घेऊ शकते. या गाडीचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे.