मुंबई : पेन ही अशी गोष्ट आहे जी माणूस नेहमी वापरतो. तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की बॉलपेनच्या झाकणाला वरती होल असतो. तो का असतो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
यावर अनेकांची उत्तरे असतील की पेनाची शाई सुकू नये म्हणून झाकणावर होल असतो. मात्र हे खरे कारण नाहीये.
याचे मुख्य कारण म्हणजे, अनेकदा पेनाचे झाकण लोक तोंडात घालतात. विशेषकरुन लहान मुले. जर चुकून पेनाचे झाकण तोंडात अडकले तर हवा आरपार जावी यासाठी हा होल असतो. पेनाच्या झाकणावर होल नसेल तर आत हवा आरपार जाणार नाही. यामुळे श्वास गुदमरुन जीवही जाऊ शकतो.
त्यामुळे पेनाच्या झाकणावर हा लहान होल बनवलेला असतो. म्हणजेत चुकून हे तोंडात गेल्यास जीव जाण्याचा धोका कमी होतो.