व्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य!

Updated: Oct 30, 2014, 06:25 PM IST
व्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य! title=

व्हॉट्स अॅप ही एक मॅसेज देणारी सेवा आहे. अल्पावधीतच तरूणांमध्ये व्हॉट्स अॅप प्रसिद्ध झालं असून व्हॉट्स अॅपमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

कटू सत्य

व्हॉट्स अॅपमुळे आपण आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सशी कनेक्टेड राहतो. पण, व्हॉट्स अॅपवर चॅट मॅसेज हे आपल्या जवळच्या लोकांपासून लांब घेऊन जाऊ शकतो. लोकांना नेहमी असे वाटते की, व्हॉट्स अॅपवर पाढविलेला मॅसेज एका टिक मार्क म्हणजे मॅसेज डिलीवर झाला आहे आणि दुसऱ्या टिकवर मार्क म्हणजे तो मॅसेज त्या व्यक्तीने वाचला आहे, असा लोकांचा गैरसमज होतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्या मित्रांनी आपला मॅसेज वाचला की, नाही त्यामुळे यावरून अनेक वाद होतात. त्यांनी आपल्या मॅसेजचा रिप्लाय का नाही दिला म्हणून वाद निर्माण होऊन मैत्रीमध्ये दुरावा येतो.

टिक मार्कचा अर्थ -

एक टिक मार्क -

 
 व्हॉट्स अॅपवर मॅसेज पाढविल्यानंतर पहिली टिक मार्क म्हणजे मॅसेच यशस्वीपणे डिलीवर झाला आहे.

दोन टिक मार्क - 

 
पाठविलेल्या मॅसेजवर जर दोन टिक मार्क आले. दोन टिकमुळे आपल्या फ्रेंडकडे हा मॅसेज डिलीवर झाला आहे. पण, डबल टिक मार्क हा मॅसेज वाचल्याची गॅरेंटी देत नाही.

फेसबुक आणि बीबीएमची सुविधा

तुम्ही पाढविलेला मॅसेज तुमच्या मित्रांनी वाचला की, नाही. याचे कंफर्मेशन मिळणे गरजेचे आहे. फेसबुक आणि बीबीएम (ब्लॅकबॅरी मॅसेजवर) ही सुविधा देण्यात आली आहे. फेसबुकवर मॅसेज डिलीवर झाल्यानंतर 'सेन्ट' आणि मॅसेज वाचल्यानंतर 'सीन' असे लिहिल्यानं दिसून येते. तर बीबीएममध्ये 'डी' आणि 'आर' लिहल्याले दिसते. 'डी' म्हणजे डिलीवर झाला असून 'आर' म्हणजे रीड असा आहे. व्हॉट्स अॅपमध्ये मॅसेज वाचला की नाही हे समजणारे असे फिचर नाही. त्यामुळे डबल टिक मार्क समजण्यास लोक कंफ्यूज होतात.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.