Whatsappचा एक SMS मुंबई रेल्वेतील रोमियोंचा कर्दनकाळ

मुंबईत रेल्वेमध्ये अनेकवेळा महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. हा प्रकार रेल्वे रोमियोंकडून होत असल्याचे पुढे आलेय. आता Whatsapp चा एक संदेश रोमियो यांचा कर्दनकाळ ठरणार आहे. कारण महिला पोलिसांचे 'शक्ती पथक' कार्यरत झालेय.

Updated: Dec 10, 2014, 09:33 PM IST
Whatsappचा एक SMS मुंबई रेल्वेतील रोमियोंचा कर्दनकाळ title=

मुंबई : मुंबईत रेल्वेमध्ये अनेकवेळा महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. हा प्रकार रेल्वे रोमियोंकडून होत असल्याचे पुढे आलेय. आता Whatsapp चा एक संदेश रोमियो यांचा कर्दनकाळ ठरणार आहे. कारण महिला पोलिसांचे 'शक्ती पथक' कार्यरत झालेय.

रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचे 'शक्ती' पथक नेमण्यात आले आहे. एकूण ९ पथके महिलांची सुरक्षा घेणार आहेत. कोणी रेल्वेत छेड काढली किंवा रेल्वे रोमियो दिसला तर एक मॅसेज Whatsappवरुन पाठवल्यानंतर महिला पोलिसांचे काम सुरु होईल आणि रोमियाला चांगलाच धडा शिकवतील.

महिला प्रवाशी संघटनांच्या  प्रतिनिधींना व्हाट्सअॅप ग्रुपवर प्रथमच स्थान देऊन ही पथके महिला रेल्वे प्रवाशांच्या हाकेला धावणार आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने यासाठी पुढाकार घेतला आहे. Whatsappवरून आलेल्या संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी हे महिला शक्ती पथक काम करील. ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर महिला सुरक्षा प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी लक्षात घेऊन तशी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रत्येक पथकात एक महिला उपनिरीक्षक, एक सहाय्यक महिला उपनिरीक्षक, एक महिला शिपाई आणि एका पुरुष कॉन्स्टेबलचा समावेश असेल. सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ वाजता अशी दोन शिफ्टमध्ये महिला पथक काम करेल. तसा रेल्वेवर वॉच असणार आहे.

Whatsappच्या माध्यमातून ९ टीम एकमेकांच्या संपर्कात राहणार आहेत. तसेच व्हाट्सअॅप ग्रुप कंट्रोल रुमशी संपर्कात राहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.