नवी दिल्ली: गुगलवर सर्च करणं आता काही अवघड राहिलेलं नाही. तरीदेखील बऱ्याचवेळा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी शोधण्यास तुमचा बराच वेळ वाया जातो. गुगलवर काहीही सर्च करण्याच्या काही साध्या पध्दती आहेत. ज्यामुळे तुम्हाला ते खूप सोपं वाटेल.
1. वाक्य शोधण्यासाठी तुम्ही ('') कोटचा वापर करू शकता.
ही एक सोपी पध्दत आहे. साधारणत: गुगलवर तुम्हाला हवी असणारी पानंच फक्त तुम्हाला दिसतील. ती देखील त्याचक्रमानं जसे तुम्हाला हवे आहे. ज्यात कोणताही कोट किंवा नॉव्हेलचं नाव किंवा तुम्ही एखादा पॅरिग्राफ शोधत असाल तर तो तुम्हाला लगेल मिळू शकेल.
2. स्टारचा वापर (*)
(*)चा वापर करून तुम्हाला आठवत नसलेला एखादा शब्द किंवा वाक्य किंवा गाणं तुम्ही त्या शब्दाच्या आधी (*) लिहू शकता. उदाहरण: You're Beautiful, its *true. किंवा असं देखील होऊ शकतो. * is lighter than Oxyen.
3. मायनस करून टाका सर्चला (-)
मायनसच्या वापरानं तुम्हाला नको असलेले पेज तुम्ही काढून टाकू शकता. तुम्हाला नको असलेला शब्द तुमच्या पेजवरून आपोआप दूर होऊ शकतो. उदाहरण, jacket - nehru
4. वेबसाईटमध्ये शोधा Key Word
जर तुम्हाला बघायचं असेल की कोणत्या वेबसाईटनं एखाद्या खास शब्दाचा वापर केला आहे. तर तो शोधण्यासाठी 'site'हा खूप सोपा उपाय आहे. उदाहरण, भारत सरकार मध्ये 'प्रणब' शब्दाचा वापर आहे आणि जर तो शोधायचा असेल तर तुम्ही फक्त लिहा, Pranab site:india.gov.in.
5. शोधा २० वर्षापूर्वीच्या बातम्या
गुगल न्यूजवर तुम्ही १०० वर्षापूर्वीच्या बातम्या शोधू शकता. फक्त गुगल न्यूजमध्ये टाईप करा google news archieve search आणि हवी ती तारिख टाकून ती बातमी शोधा.
6.vs लावून तुलना करा जेवणाची
जर तुम्हाला समजत नसेल की पिज्जा खावा कि बर्गर? टाइप करा pizza vs burger. दोघांच्या खाण्यानं काय फायदा होईल आणि काय नुकसान, किती कॅलरी मिळणार आणि किती कार्बोहाइड्रेट, सगळं काही तुम्हाला कळू शकते.
7. रेसिपीसाठी सर्च रिझल्टचा वापर करा
जर तुम्ही तुमच्या आवडीची रेसिपी शोधत असाल तर सर्च बारमध्ये जाऊन तुमच्या रेसिपीला अधिक प्रकारे फिल्टर करून पाहू शकता.
8. डिफाइनचा वापर
कोणत्याही शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी त्या आधी Define असं लिहा आणि सर्च करा. उदाहरण - Define: charas
9. स्क्रिन दिसेल तिरकी
गुगलवर tilt लिहा आणि चमत्कार पाहा. गुगल स्क्रिन तिरकी होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसमोर हा प्रयोग करू शकता आणि त्यांना ही गंमत दाखवू शकता.
10. गुगल ईमेजमध्ये गेम
तुम्ही विचारात पडला असाल की गुगल ईमेजमध्ये तर ईमेजेस मिळतात पण गेम ..? होय गुगल ईमेजमध्ये Atari Breakout टाईप करा आणि गेमचा आनंद लुटा.
11. फोटोच्या साहाय्यानं फोटो शोधा
तुम्हाला जर एका फोटावरून त्याच्यासारखाच दुसरा फोटो हवा असेल तर तो तुम्ही कॅमेरा बटणमध्ये अपलोड करून त्यासारखाच फोटो तुम्हाला मिळेल.
12. टॉस करा विना कॉइनचं
सर्च बॉक्समध्ये टाईप करा flip a coin किंवा heads or tails. त्यानंतर तुम्हाला टॉसचा आनंद लुटता येईल.
13. गुगल सर्च बारमध्ये माईक ऑन करा आणि म्हणा give me a love quote किंवा I love you. तुमच्या समोर लव कोट्स खूप समोर येतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.