न्यू यॉर्क : इन्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने वार्षिक सब्सक्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी काही देशांना सोडून जगभरात एका वर्षासाठी या अॅपला वापरण्यासाठी ०.९९ डॉलर द्यावे लागत होते. आता बहुतांशी युजर्सची सर्व्हिस विना पैशांची एक्सटेंड करण्यात आली आहे.
याची घोषणा व्हॉट्सअॅपचा संस्थापक जॅन कूम याने जर्मनीमध्ये डीएलडी कॉन्फरन्समध्ये केली. रिको़डनुसार या रिटेलने कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे यासाठी पैसे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीच्या अधिकारीक ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की, अनेक व्हॉट्सअॅप युजर्सजवळ क्रेडीट किंवा डेबिट कार्ड नसतात. तसेच त्यांना भीती असते की एक वर्षांनंतर त्याचे व्हॉट्सअॅप बंद होऊन जाईल. पण आता अशा प्रकारे पैसे घेणे आम्ही बंद केले आहे. त्यामुळे कोणत्याही युजर्सला पैसे द्यावे लागणार नाही.
बिझनेस आणि संस्थांसाठी व्हॉट्सअॅप
आगामी काळात बिझनेस आणि ऑर्गनायझेशनसाठी कंपनी व्हॉट्सअॅप तयार करणार आहे. दरम्यान, या बाबत अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही की, हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये दिले जाईल की नंतर देण्यात येईल.