आमिरला कानाखाली लगावणारी साईट पलटली झाली किस आमिर

इंटरनेट जगतात आमिर खानच्या असहिष्णतेच्या वक्तव्यावर अनेक कमेंट, मतं, लाइक्स मिळाले. या आमिरच्या चर्चेतील विषयाचा फायदा घेत काही वाहत्या गंगेत हात धूऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला आहे. 

Updated: Nov 30, 2015, 05:26 PM IST
आमिरला कानाखाली लगावणारी साईट पलटली झाली किस आमिर title=

मुंबई : इंटरनेट जगतात आमिर खानच्या असहिष्णतेच्या वक्तव्यावर अनेक कमेंट, मतं, लाइक्स मिळाले. या आमिरच्या चर्चेतील विषयाचा फायदा घेत काही वाहत्या गंगेत हात धूऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला आहे. 

आमिर खानला कानाखाली लगवा अशा आशायाची एक साइट बनवली. “Slapaamir.com' त्या साइटवर ६३ लाख जणांनी आमिरला कानाखाली लगावली होती. पण आता या साइटला भेट देऊन आमिरला कानाखाली लगावण्याची इच्छा असणाऱ्यांना धक्का बसतो आहे. 

आता “Slapaamir.com' बदलून “kissaamir.com झाली आहे. त्यामुळे आता आमिरला कानाखाली न लगावता त्याला किस करावा लागत आहे. यात लिहिले आहे की दया, प्रेम आणि सहिष्णूता पसरवा. असा संदेश देण्यात येतो आहे. 

देशातील अहिसष्णूतेचे वातावरणामुळे माझ्या पत्नीला भिती वाटते आणि मुलांच्या सुरक्षेसाठी देश सोडून जावेसे वाटते असे आमिर खानने एका मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर देशभरात खूप मोठा वाद निर्माण झाला होता. 

आमिर खान याला जो कोणी काना खाली मारेल त्याला १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असे पंजाबच्या शिवसेना शाखेने जाहीर केले होते. त्यातून आयडीयाची कल्पना घेऊन आमीरला कानाखाली लगावण्याची साईट तयार करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आता त्याच्या विरूद्ध भूमिका घेत किस आमीर अशी साइट करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.