२१ मेगापिक्सेल कॅमेरा...४ जीबी रॅमचा स्मार्टफोन

चिनी उत्पादक कंपनीचा 'व्हिवो एक्स ६' हा नवा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लीक झालाय. कंपनीचे एक्स ६ प्लस एल आणि एक्स ६ प्लस डी हे स्मार्टफोनही ऑनलाइन वेबसाइटवर लीक झालेत. 

Updated: Nov 30, 2015, 12:01 PM IST
 २१ मेगापिक्सेल कॅमेरा...४ जीबी रॅमचा स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : चिनी उत्पादक कंपनीचा 'व्हिवो एक्स ६' हा नवा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लीक झालाय. कंपनीचे एक्स ६ प्लस एल आणि एक्स ६ प्लस डी हे स्मार्टफोनही ऑनलाइन वेबसाइटवर लीक झालेत. 

'व्हिवो एक्स ६ प्लस' या स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार फीचर्स दिलेत. यामध्ये तब्बल ४ जीबी रॅमची सुविधा देण्यात आलीय. यामुळे फोनचा परफॉर्मन्स दमदार राहील. यामध्ये फिंगरप्रिंट सेंसरची सुविधाही देण्यात आलीय. या स्मार्टफोनला युकेच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आलाय. 

वेबसाईटच्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. ज्यात १४४०x२५६० रिझोल्यूशन आहे. यात २१ मेगापिक्सेलच रेयर कॅमेरा आहे तर फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सेल आहे. इंटरनल मेमरी ३२ जीबी देण्यात आलीय. अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप सिस्टीमवर काम करतो. ४जी कनेक्टिविटीसह ड्युअल सिमही आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.