‘डॉट भारत’… आता मिळवा डोमेन मराठीत!

देवनागरी लिपिमध्ये कोणत्याही वेबसाईटचं डोमेन नाव नोंदणी पुढच्या महिन्यापासून केलं जाऊ शकेल. नॅशनल इंटरनेट एक्सचेंड ऑफ इंडियाचे सीईओ गोविंद यांनी ही माहिती दिलीय. 

Updated: Jul 29, 2014, 09:07 AM IST
‘डॉट भारत’… आता मिळवा डोमेन मराठीत! title=

नवी दिल्ली : देवनागरी लिपिमध्ये कोणत्याही वेबसाईटचं डोमेन नाव नोंदणी पुढच्या महिन्यापासून केलं जाऊ शकेल. नॅशनल इंटरनेट एक्सचेंड ऑफ इंडियाचे सीईओ गोविंद यांनी ही माहिती दिलीय. 

गोविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी किंवा हिंदी स्क्रिप्ट (देवनागरी लिपि) मध्ये डोमेन (वेबसाईट) नावाचं बुकिंग 15 ऑगस्टपासून प्रस्तावित केलीय. उच्च अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार आहे. 

प्रत्येक डोमेन नावासाठी 350 रुपयांचं शुल्क असेल तसंच मराठी, हिंदू स्क्रिप्टमध्ये उच्च स्तरीय डोमेन (टीएलडी) ‘डॉट भारत’ असा उल्लेख असेल. मराठी, हिंदी स्क्रिप्टमध्ये डोमेन नावाचं एक्सटेन्शन ‘डॉट कॉम’ या ‘डॉट नेट’ ऐवजी ‘डॉट भारत’ असं असेल.  

गोविंद यांच्या म्हणण्यानुसार, डोमेनच्या नोंदणीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या कंपन्याही देवनागरी डोमेन नावासाठी नोंदणी करू शकतात. पहिल्या दोन महिन्यांमध्ये ज्यांच्याकडे कॉपीराईट किंवा ट्रेड मार्क आहे त्या कंपन्यांसाठी हा डोमेन उपलब्ध असेल. त्यानंतर मात्र हा देवनागरी डोमेन सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. प्रत्येक डोमेन नोंदणीकरणासाठी 250 रुपये शुल्क आकारलं जाईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.