जीपीएस, ब्लू टूथसहीत... फॉक्सवॅगनची 'वेन्टो कनेक्ट' बाजारात!

जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगननं सेडान कार ‘वेंटो’ची एक नवी आवृत्ती ‘वेन्टो कनेक्ट’ सोमवारी भारतीय बाजारात उतरवलीय. 

Updated: Aug 19, 2014, 02:48 PM IST
जीपीएस, ब्लू टूथसहीत... फॉक्सवॅगनची 'वेन्टो कनेक्ट' बाजारात! title=

नवी दिल्ली : जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगननं सेडान कार ‘वेंटो’ची एक नवी आवृत्ती ‘वेन्टो कनेक्ट’ सोमवारी भारतीय बाजारात उतरवलीय. 

‘वेन्टो कनेक्ट’ची मुंबई शोरुममध्ये किंमत 7.84 लाख रुपयांपासून 9.8 लाख रुपयांपर्यंत आहे. 

‘वेन्टो कनेक्ट’ ग्राहकांची विशेष पसंती लक्षात घेऊन अनेक सोई-सुविधांसहीत लॉन्च करण्यात आलीय. यामध्ये ब्लापंक्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिम, जीपीए नॅव्हीगेशन इत्यादी आधुनिक सुविधांचाही समावेश आहे. 

फॉक्सवॅगन पॅसेंदर कार्सचे प्रमुख मायकल मेयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून आपल्या कारमध्ये प्रत्येक क्षणाला कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन व्हावं, अशी मागणी होतेय... आणि ग्राहकांची हीच मागणी पूर्ण करत ‘वेन्टो कनेक्ट’ बनवण्यात आलीय. 

पॅकेजमध्ये जीपीएस नॅव्हिगेशन, ब्लू टूथ टेलिफोनी आणि सोशल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचाही समावेश आहे. 

‘वेन्टो कनेक्ट’चं पेट्रोल व्हर्जन 7.84 लाख रुपयांपासून 9.8 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तर याच कारच्या डिझेल व्हर्जनसाठी 8.99 लाख रुपयांपासून ते 9.8 लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतील.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.