व्हिडीओकॉनचा स्वस्त ४जी स्मार्टफोन लाँच

व्हिडीओकॉन मोबाईल कंपनीने शुक्रवारी व्हिडीओकॉन झेड५५ क्रिप्टॉन हा नवा स्मार्टफोन लाँच केला. अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा आहे. 

Updated: Dec 20, 2015, 03:57 PM IST
व्हिडीओकॉनचा स्वस्त ४जी स्मार्टफोन लाँच title=

नवी दिल्ली : व्हिडीओकॉन मोबाईल कंपनीने शुक्रवारी व्हिडीओकॉन झेड५५ क्रिप्टॉन हा नवा स्मार्टफोन लाँच केला. अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा आहे. 

पाच इंचाचा डिस्प्ले असून  १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आलाय. यात एक जीबी रॅम आहे. आठ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. याची किंमत कंपनीने ७, ९९९ रुपये ठेवलीय. 

यात १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा देण्यात आला. तर पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. तसेच यामध्ये सुरक्षिततेसाठी व्ही सेफ अॅप देण्यात आलंय. तसेच यात ४जी कनेक्टिव्हीटीही देण्यात आलीय.