बीएसएनएलकडून कॉल रेटमध्ये ८० टक्क्यांनी कपात

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)ने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या आधीच गिफ्ट दिलेय. बीएसएनलने कॉल दरात ८० टक्क्यांची कपात केलीय. 

Updated: Dec 20, 2015, 03:32 PM IST
बीएसएनएलकडून कॉल रेटमध्ये ८० टक्क्यांनी कपात title=

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)ने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या आधीच गिफ्ट दिलेय. बीएसएनलने कॉल दरात ८० टक्क्यांची कपात केलीय. 

बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. कंपनीने नव्या ग्राहकांना कॉलदरात ८० टक्क्यांची घट करण्याचा निर्णय घेतलाय. 

त्यामुळे प्रति मिनिट आणि प्रति सेकंदाच्या कॉल दरात  घट होणार आहे. ही सुविधा पहिल्या दोन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. बीएसएनएल घेणाऱ्या नव्या ग्राहकांना प्रति सेकंद प्लान घेण्यासाठी ३६ रुपये आणि प्रति मिनिटाचा प्लान घेण्यासाठी ३७ रुपयांचा रिचार्ज वाऊचर घ्यावा लागेल.