व्हिडिओ : नवीन जगाच्या ओळखीसाठी करा आईला मदत!

तुमच्या आईला ऑनलाईन आणण्यासाठी मदत करा, अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अनेकांचं लक्ष खेचून घेतोय. 

Updated: May 21, 2015, 06:34 PM IST
व्हिडिओ : नवीन जगाच्या ओळखीसाठी करा आईला मदत! title=

मुंबई : तुमच्या आईला ऑनलाईन आणण्यासाठी मदत करा, अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अनेकांचं लक्ष खेचून घेतोय. 

घराला पूर्ण वेळ देणाऱ्या स्त्रिया क्वचितच वेळ काढून ऑनलाईन जगाचा आढावा घेताना दिसतात. त्यामुळेच, अशा स्त्रियांना टार्गेट करून त्यांनाही या ऑनलाईन जगताची ओळख करून देण्यासाठी गूगलनं 'हेल्पिंग वुमन गेट ऑनलाईन' हा कार्यक्रम राबवायचं ठरवलंय. याच उपक्रमाचा भाग म्हणून एक व्हिडिओ गूगलनं प्रसारित केलाय... 

हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर सध्या जोरात फिरतोय... त्यामागचं कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपसूकच तुमच्या लक्षात येईल... मग पाहा... 

व्हिडिओ पाहा :-   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.