धक्कादायक व्हिडिओ : ... आणि सापाची आत्महत्या कॅमेऱ्यात कैद!

तुम्ही माणसानं आत्महत्या केलेली ऐकली असेल... पण, प्राण्यानं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलंय का?

Updated: Apr 6, 2017, 12:41 PM IST
धक्कादायक व्हिडिओ : ... आणि सापाची आत्महत्या कॅमेऱ्यात कैद! title=

मुंबई : तुम्ही माणसानं आत्महत्या केलेली ऐकली असेल... पण, प्राण्यानं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलंय का?

पण, अशीच एक घटना सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली दिसतेय... हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सापही आत्महत्या करतात का? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. 

हा धक्कादायक व्हिडिओ आत्तापर्यंत यू ट्यूबवर जवळपास दीड करोड लोकांनी पाहिलाय. TheComputerFreakDK  या आयडीनं यूट्यूबवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. 'सापानं आत्महत्या केल्याचं' त्याच्या नावात म्हटलं गेलंय. 

परंतु, मुंग्यांनी हल्ला केल्यानंतर साप स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे आपला फणा आपटू शकतो, असंही काहींचं म्हणणं आहे.