मुंबई : आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एखाद्या योग्य माध्यमाची निवड करणं खूप गरजेचं असतं... आजकाल दिवसातला अधिकाधिक वेळ इंटरनेटवर व्यतीत करणाऱ्या तरुणांना शेतकऱ्यांचं दु:ख काय असतं... त्यांच्या कुटुंबीयांची फरपट काय असते? याची जाणीव करून देण्याचं काम हा एक अवघ्या 4 मिनिटांचा व्हिडिओ करतोय.
खेड्याच्या ठिकाणी, शेतावर गुजराण अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खास करून त्यांच्या पुढच्या पिढीच्या मनात आपल्या आजुबाजुची परस्थिती पाहून काय खलबतं सुरू असतं... हे दाखवण्याचा 'स्कायमेट'चा हा एक प्रयत्न... सध्या हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.
हा व्हिडिओ प्रत्येकाच्याच मनाला स्पर्शून जातोय, हे मात्र नक्की
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.