मुंबई: फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय.
You can say a lot with a heart. Introducing a new way to show how you feel on Twitter: https://t.co/WKBEmORXNW pic.twitter.com/G4ZGe0rDTP
— Twitter (@twitter) November 3, 2015
ट्विटरवरील या नव्या आयकॉनला लाईक्स असं म्हटलं गेलंय. ट्विटरला अधिक युजर फ्रेंडली करण्यासाठी आणि यूझर्सना आपल्या भावना पोहोचविण्यासाठी हा बदल केल्याचं ट्विटरनं सांगितलं. हार्टमधून सकारात्मकता, पाठिंबा, सहभाग लाईक, लॉल, वॉव यासारख्या अनेक भावना पोहचवता येतील असं ट्विटरने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
ट्विटरवर सध्या #TwitterHeart हॅशटॅह ट्रेंड होतोय. काही जणांना हा बदल पटलेला नाहीय. त्यामुळं #WeWantFavButtonBack हा हॅशटॅगही ट्रेंड होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.