बंगळुरूची 'झिपडायल' ट्विटरने खरेदी केली

सुप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने बंगळुरूची 'झिपडायल' खरेदी केली आहे. 'झिपडायल' ही मोबाईल फोनद्वारे प्रसिद्धी करणारी कंपनी आहे. हा व्यवहार १८० ते २५० कोटी रूपयांपर्यंत झाला असल्याची शक्यता आहे. मात्र ही किंमतीपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याची चर्चाही दुसरीकडे आहे.

Updated: Jan 20, 2015, 06:10 PM IST
बंगळुरूची 'झिपडायल' ट्विटरने खरेदी केली    title=

बंगळुरू : सुप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने बंगळुरूची 'झिपडायल' खरेदी केली आहे. 'झिपडायल' ही मोबाईल फोनद्वारे प्रसिद्धी करणारी कंपनी आहे. हा व्यवहार १८० ते २५० कोटी रूपयांपर्यंत झाला असल्याची शक्यता आहे. मात्र ही किंमतीपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याची चर्चाही दुसरीकडे आहे.

बंगळुरूमधील 'झिपडायल' ही कंपनी विविध उत्पादनांची माहिती एसएमएसद्वारे कळविते.  या बदल्यात ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही, त्यासाठी ग्राहकांना केवळ मिस्डकॉल द्यावा लागतो. 

'झिपडायल' आपल्याकडे उपलब्ध असलेले क्रमांक मार्केटिंगसाठी पुरविते. परस्परांना संपर्क करण्याच्या पारंपारिक 'मिस कॉल' पद्धतीचा 'झिपडायल'ने उपयोग केला आहे.

'भारतासारख्या बाजारपेठेत व्यवसायवृद्धीची मोठी संधी असल्याने आम्ही भारतात गुंतवणूक करत आहोत' असं ट्‌विटरने म्हटलं आहे. गतवर्षी फेसबुकने लिटिर आय लॅब्स, तर याहूने बुकपॅड खरेदी केले होते.

या व्यवहारामुळे बंगळुरूमध्ये ट्विटर इंजिनिअरिंगचं नवं कार्यालय सुरू होऊ शकतं. तसंच भारतात ट्विटरवरील गुंतवणूक वाढेल. भारतीय बाजारात ट्विटरला खूप फायदा मिळेल. असा विश्वास ट्विटरचे दक्षिण आशिया व्यापार संचालक ऋषी जेटली यांनी व्यक्त केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.