नवी दिल्ली: नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना आणि हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्यानं तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे.
नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर गेल्या २७ मार्च ते २४ एप्रिलदरम्यान ग्राहकांनी आपल्या सूचना आणि हरकती देण्याचं आवाहन ग्राहकांना केलं होतं. या सूचनांचे सार काढून अथवा मतांची टक्केवारी काढून अहवाल प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं.
मात्र, त्यापेक्षा प्राप्त झालेली प्रत्येक सूचना पाठविणाऱ्याच्या ई-मेलसह आणि तारीख-वेळ या तपशिलासह ट्रायनं प्रसिद्ध केल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ट्रायच्या वेबसाईटवरून जाऊन साधा सर्च देऊनही ही सर्व माहिती संध्याकाळी उशिरापर्यंत मिळवता येत होती. नंतर मात्र या माहितीच्या लिंक्स बंद करण्यात आल्या.
ट्रायकडून ही माहिती उघड झाल्यानंतर ‘अॅनॉनिमस इंडिया’ या हॅकर ग्रुपनं थोड्याच वेळात आपण ट्रायचा डेटाबेस हॅक करणार असल्याचं टिष्ट्वटरवरून जाहीर केलं आणि संध्याकाळी आपली धमकी प्रत्यक्षात आणली.
TRAI down! Fuck you http://t.co/5bNzEGt4oU for releasing email IDs publicly and helping spammers. You will be hacked soon!
— AnonOpsIndia (@opindia_revenge) April 27, 2015
आपल्याकडे कॉम्प्युटर आणि सायबर तंत्रज्ञानाचा वापर व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत गांभीर्यानं होत आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकांची माहितीच विनासायास मिळणार असेल सुरक्षेची हमी कशी मिळेल? अमेरिकेप्रमाणं आपल्याकडेदेखील ‘प्रायव्हसी अँड डेटा प्रोटेक्शन’ कायदा होणं, हे आता नितांत गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.