‘कोडॅक’ची ‘गो प्रो’ला टक्कर!

अल्पावधीत ‘गो प्रो’ हा ट्रॅव्हलिंग कॅमेरा भलताच लोकप्रिय झालेला दिसला. याच कॅमेऱ्याला उत्तर देण्यासाठी ‘कोडॅक’नं आपला एक नवा कोरा कॉम्पॅक्ट कॅमेरा बाजारात उतरवलाय. 

Updated: Nov 5, 2014, 09:12 PM IST
‘कोडॅक’ची ‘गो प्रो’ला टक्कर! title=

मुंबई : अल्पावधीत ‘गो प्रो’ हा ट्रॅव्हलिंग कॅमेरा भलताच लोकप्रिय झालेला दिसला. याच कॅमेऱ्याला उत्तर देण्यासाठी ‘कोडॅक’नं आपला एक नवा कोरा कॉम्पॅक्ट कॅमेरा बाजारात उतरवलाय. 

‘कोडॅक पिक्सप्रो एसपी 360’ असं या कॅमेऱ्याचं नाव आहे. 360 डिग्री अँगलनं या कॅमेऱ्यानं शूट करता येऊ शकतं... आणि हेच या ‘वॉटर प्रुफ’ कॅमेऱ्याचं वैशिष्ट्यं आहे.

16 मेगापिक्सलचे फोटो आणि 1080p व्हिडिओ यामध्ये शूट करता येऊ शकतात. 

वाय-फाय आणि अॅप्लिकेशन्सद्वारे हा कॅमेरा तुम्हाला तुमच्या ‘आयओएस’ आणि ‘एन्ड्रॉईड’ डिव्हायसेसला जोडता येऊ शकेल.

मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण कॅप्चर करू शकाल. डस्टप्रूफ आणि वॉटर प्रुफ केससहीत हा कॅमेरा असल्यानं तुमचे अॅडव्हेंचरही हा कॅमेरा तुमच्यासोबतच अनुभव घेईल. 

हा कॅमेरा कोडॅकच्या वेबसाईटवर $350 म्हणजेच जवळपास 21,500 रुपयांना उपलब्ध आहे. 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.